सोलापूरात महिलांचा टक्का वाढविण्यात काँग्रेस नंबर १

By Admin | Updated: February 1, 2017 18:29 IST2017-02-01T18:29:41+5:302017-02-01T18:29:41+5:30

सोलापूरात महिलांचा टक्का वाढविण्यात काँग्रेस नंबर १

Congress number 1 to increase the percentage of women in Solapur | सोलापूरात महिलांचा टक्का वाढविण्यात काँग्रेस नंबर १

सोलापूरात महिलांचा टक्का वाढविण्यात काँग्रेस नंबर १

सोलापूरात महिलांचा टक्का वाढविण्यात काँग्रेस नंबर १
शंकर जाधव : आॅनलाईन लोकमत सोलापूर
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने पुरुषांच्या बरोबरीने महिला राजकारणात सहभागी होत आहेत. २०१२ पासून महिलांना ५० टक्के आरक्षणाची संधी मिळाली. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत ५१ जागांसाठी विविध पक्षांकडून तब्बल २४७ महिला उमेदवार पदर खोचून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. पण आरक्षणाप्रमाणे त्यातील ५१ महिलांना महापालिकेत प्रवेश करता आला.
काँग्रेसने सर्व ५१ प्रभागात उभे केले होते. त्यातील २० महिला निवडणून आल्या. २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या दमयंती भोसले, मंदाकिनी तोडकरी, कुमुद अंकाराम, निर्मला नल्ला, श्रुती मेरगू, संजीवनी कुलकर्णी, जगदेवी नवले, श्रीदेवी फुलारे, कल्पना यादव, सरस्वती कासलोलकर, अश्विनी जाधव, अनिता म्हेत्रे, सुजाता आकेन, परवीन इनामदार, फिरदोस पटेल, सुशीला आबुटे, अलका राठोड, शैलजा राठोड, सारिका सुरवसे, वेदमती ताकमोगे या महिला निवडून आल्या. यातील अलका राठोड आणि सुशीला आबुटे यांना महापौरपदाची संधी मिळाली.
२०१२ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची आघाडी होती. असे असले तर काँग्रेसपाठोपाठ भाजपच्या १४ महिलांनी विजय संपादन केला. या निवडणुकीत कल्पना कारभारी, अंबिका पाटील, सुवर्णा हिरेमठ, नरसूबाई गदवालकर, रोहिणी तडवळकर, इंदिरा कुडक्याल, सुरेखा अंजिखाने, शोभा बनशेट्टी, जुगन अंबेवाले, विजया वड्डेपल्ली, शशिकला बत्तुल, श्रीकांचना यन्नम, मंगला पाताळे, मोहिनी पत्की या महिला उमेदवार विजयी झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसने ३२ महिला उमेदवार उभे केले होते. त्यातील ८ महिला निवडून आल्या. त्यात सुनीता कारंडे, शांताबाई दुधाळ, गीता मामड्याल, खैरुन्निसा शेख, सुनीता रोटे, निर्मला जाधव, नीला खांडेकर, बिस्मिल्ला शिकलगार यांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या पाच महिला निवडून आल्या होत्या. त्यात राजश्री कणके, मंगला वानकर, अंजली चौगुले, मेनका चव्हाण, राजश्री बिराजदार यांचा समावेश होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सुनंदा बल्ला व महादेवी अलकुंटे या दोन महिला निवडून आल्या. तर बसपाच्या सुनीता भोसले व उषा शिंदे या दोन महिला निवडून आल्या.
आता या खेपेस काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे प्रमुख महिला आरक्षित जागेवर सर्वच्या उमेदवार देणार आहेत. या शिवाय इतर छोटे पक्षही महिला उमेदवारांना संधी देणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उभे राहणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या बरोबरीने राहणार आहे. यामध्ये निवडून येण्यासाठी महिला उमेदवारांचा चांगलाच कस लागणार आहे.
पाच महिलांना महापौरपदाची संधी
१९८५ ते १९८७ हा पुलोद आघाडीचा अपवाद वगळता महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता आहे. महिला आरक्षणामुळे काँग्रेसच्या शेवंताबाई पवार, अरुणा वाकसे, नलिनी चंदेले, अलका राठोड, सुशीला आबुटे यांना महापौरपदाची संधी मिळाली. शेवंताबाई पवार वगळता बाकी महिलांना अडीच ते तीन वर्षे महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यापूर्वी १९६९ साली महापालिकेत माजी आ. निर्मलाताई ठोकळ यांनी महिला नगरसेविका म्हणून प्रथम पाऊल टाकले. त्यानंतर प्रा. नसीमा पठाण आणि सुषमाताई घाडगे यांनी निवडून आल्या. या दोघींनीही उपमहापौर पद भूषविले.

Web Title: Congress number 1 to increase the percentage of women in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.