शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला कोण मॅनेज होतंय पाहिलंय; शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख कोठेंचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 13:00 IST

लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाºयांची बैठक होटगी रोडवरील एका हॉटेलमध्ये झाली.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाºयांची बैठक होटगी रोडवरील एका हॉटेलमध्ये झालीविषय समित्यांच्या वाटपाबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यात चर्चा

सोलापूर: महापालिकेतील विषय समित्यांच्या वाटपाबाबत भाजपासोबत वाटाघाटी सुरू आहेत. या वाटाघाटी पूर्ण झाल्याशिवाय शिवसैनिकांनी प्रचारात सहभागी होऊ नये, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी केले. काँग्रेसला कोण मॅनेज होतंय ते मी पाहिलंय असेही कोठे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाºयांची बैठक होटगी रोडवरील एका हॉटेलमध्ये झाली. शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, प्रताप चव्हाण, सुनील शेळके, पद्माताई म्हंता, शांता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेतही आता भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे.

विषय समित्यांच्या वाटपाबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यात चर्चा झाली होती, पण या चर्चेतून तोडगा निघाला नाही. सेना पदाधिकाºयांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. जोपर्यंत वाटाघाटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रचारात सहभागी व्हायचे नाही, असा निरोप वरिष्ठ पातळीवरून देण्यात आला आहे. तोपर्यंत कुणीही प्रचारात सहभागी होऊ नका. पक्षशिस्त मोडल्यास त्यावर कारवाई होईल, असा इशाराही सावंत यांनी दिला.

या बैठकीत शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रताप चव्हाण (शहर), सुनील शेळके (शहर उत्तर), सूर्यकांत कोकटनूर (शहर मध्य), उमेश गायकवाड (शहर दक्षिण). यांची निवड झाली. यावेळी संघटकांच्याही निवडी करण्यात आल्या; तर प्रमुख पदाधिकाºयांचा समावेश असलेली शहर समन्वय समिती नेमण्यात आली.

काँग्रेसला कोण मॅनेज होतंय पाहिलंय : कोठेंचा टोला- या बैठकीला शिवसेनेचे काही पदाधिकारी अनुपस्थित होते. या मुद्याला धरून महेश कोठे म्हणाले, भाजपावाल्यांनी परस्पर निरोप दिले तर कोणी जाऊ नका. महापालिकेतील तिढा अद्याप मिटलेला नाही. आपण ज्या पक्षात असतो त्याच्याशी नेहमी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. शिवसेनेशी कोण-कोण गद्दारी करतंय हे मी काँग्रेसमध्ये असल्यापासून पाहत आलोय. आज ही मंडळी बाहेर राहून स्वत:ची मते व्यक्त करीत आहेत. आपल्या पदाचा वापर शिवसेना वाढीसाठी करा, असेही कोठे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक