कृषी विधेयकाच्या विरोधात पंढरपुरात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST2020-12-05T04:45:02+5:302020-12-05T04:45:02+5:30

मजूर व इतर शेती संबंधित कामगारांच्या विरोधात विधेयक पास करून सर्वसामान्य शेतकऱ्यांची गळचेपी करणारे विधेयक आहे. यामुळे सर्व देशभरातील ...

Congress agitation in Pandharpur against the Agriculture Bill | कृषी विधेयकाच्या विरोधात पंढरपुरात काँग्रेसचे आंदोलन

कृषी विधेयकाच्या विरोधात पंढरपुरात काँग्रेसचे आंदोलन

मजूर व इतर शेती संबंधित कामगारांच्या विरोधात विधेयक पास करून सर्वसामान्य शेतकऱ्यांची गळचेपी करणारे विधेयक आहे. यामुळे सर्व देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनास काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या करून त्वरित पास केलेले विधेयक रद्द करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष राज भादुले, नागेश गंगेकर, मधुकर फलटणकर, अशपाक सय्यद, देवानंद इरकल, गणेश माने, सुहास भाळवणकर, दत्तात्रय बडवे, समीर कोळी, अमर सूर्यवंशी, सागर कदम, पिंटू भोसले, संदीप कदम, अमर पाटील, राजाभाऊ कुराडे, संदीप पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

---

०३पीएएनडी०१-काँग्रेस आंदोलन

फोटो : पंढरपूर तहसील कार्यालय परिसरात कृषी विधेयकाला विरोध करताना काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी.(छाया : सचिन कांबळे)

Web Title: Congress agitation in Pandharpur against the Agriculture Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.