दुसरा विवाह केल्याने पहिल्या पत्नीची पोलिसात फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST2021-03-18T04:21:50+5:302021-03-18T04:21:50+5:30

खिलारवाडी येथील सारिका नेमचंद्र खांडेकर हिचा पती नेमचंद्र खांडेकर याने दुसरे लग्न केल्याचे पत्नी सारिकाला मागील एक वर्षापूर्वी समजले ...

Complaint of the first wife to the police for remarrying | दुसरा विवाह केल्याने पहिल्या पत्नीची पोलिसात फिर्याद

दुसरा विवाह केल्याने पहिल्या पत्नीची पोलिसात फिर्याद

खिलारवाडी येथील सारिका नेमचंद्र खांडेकर हिचा पती नेमचंद्र खांडेकर याने दुसरे लग्न केल्याचे पत्नी सारिकाला मागील एक वर्षापूर्वी समजले होते. परंतु तिच्याकडे तसा कोणताही पुरावा नसल्यामुळे व कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे तशी कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे वडील प्रभू मारुती आकळे यांनी कोणतीही हालचाल केली नव्हती. दरम्यान सारिकाच्या वडिलांनी माहिती काढून जावई नेमचंद्र याने सारिका सर्जेराव काळेल (रा. वळई, ता. माण, जि. सातारा) हिच्याशी १ फेब्रुवारी २०२० रोजी दु. १ च्या सुमारास खिलारवाडी येथील राहत्या घरी दुसरे लग्न केल्याचे लग्न पत्रिकेवरून उघडकीस आले. याबाबत पत्नी सारिका व तिचे वडील प्रभू काकडे यांनी जावई नेमचंद्र खांडेकर यास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

Web Title: Complaint of the first wife to the police for remarrying