आमदार परिचारकांच्या विरोधात पोलीसात तक्रार,
By Admin | Updated: February 19, 2017 14:56 IST2017-02-19T14:56:54+5:302017-02-19T14:56:54+5:30
मराठा समाजाचे जोडोमारो आंदोलन

आमदार परिचारकांच्या विरोधात पोलीसात तक्रार,
आमदार परिचारकांच्या विरोधात पोलीसात तक्रार, मराठा समाजाचे जोडोमारो आंदोलन
सोलापूर : भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नींबद्दल प्रचार सभेवेळी बेताल वक्तत्व करणाऱ्या विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांच्याविरोधात शिवसेनेच्यावतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे़ शिवाय वक्तव्याच्या निषेध करीत येथील पार्क चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ़ प्रशांत परिचारक यांच्या प्रतिमेस चप्पलचा हार घालीत आंदोलन केले़ या आंदोलनात माजी सैनिकांचाही सहभाग होता.
भाजपाच्या प्रचार सभेसाठी आ़ प्रशांत परिचारक हे पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील सभेत बोलत होते़ विरोधकांबाबत बोलताना उदाहरणदाखल परिचारक यांनी भारतीय सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते़ या विधानाची क्लीप सोशल मिडियावर वेगाने पसरली़ त्यामुळे सोशल मिडियावरही प्रशांत परिचारक यांच्यावर टिका करण्यात आली़ यामुळे परिचारक यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेऊन या विधानाबद्दल जाहीर माफी मागुन दिलगिरी व्यक्त केली़
प्रशांत परिचारक यांनी माफीनाम्यात म्हटले आहे की, हे वक्तव्य अनावधानाने झाले आहे. सैनिकांबद्दल मला विशेष आदार आहे. सैनिक आपल्या प्राणाची बाजी लाऊन देशाचे रक्षण करतात. त्यांचा अपमान माज्याकडून होणे शक्य नाही. गेली ४० वर्षे राजकारणात आमच्या परिवाराकडून चुकीची कृती झालेली नाही. माझ्यामुळे कोणच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे नमुद करण्यात आले आहे़