शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

लोकमंगलचा रविवारी सामुदायिक विवाह सोहळा ; १०७ वधुवरांच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 14:45 IST

लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा : ७ हजार स्वयंसेवक, तयारी अंतिम टप्प्यात

ठळक मुद्देवधुवर, पालकांसाठी समुपदेशनशासनाच्या योजनांच्या माहिती दालन     स्वरांजलीच्या सजावटीचे व्यासपीठ

सोलापूर : लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने रविवार १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता या गोरज मुहूर्तावर लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या मंगलमय उपक्रमात सर्वधर्मीय १०७ वधू-वरांच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार आहेत. हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणाताील मंडपात हा सोहळा पार पडणार आहे.  यासाठी ७ हजार स्वयंसेवक कार्यरत असणार असल्याची माहिती लोकमंगल उद्योग समुहाचे मनिष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व राज्य बँकेचे संचालक अविनाश महागांवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात श्री श्री श्री १००८ श्रीशैल जगदगुरू डॉ. चनसिद्ध पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बँकेचे संचालक अविनाश महागांवकर, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, उत्तर पं.स़ सदस्य इंद्रजित पवार यांच्यासह अन्य विविध समाजातील मान्यवर, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित असणार आहेत.

यंदा या उपक्रमाचे १३ वे वर्ष असून हा सोहळा ३० वा आहे. यासाठी ७ हजार स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत़  या तपपूर्तीत २ हजार ५९५ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला आहे. यंदाच्याही या सोहळ्यात प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे यासह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य दिले जाणार आहे. वºहाडींना भोजन, वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले जाणार आहेत.

वधू-वरांची शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे़ आजपर्यंत २२३ मुलींच्या नावे ही ठेव ठेवण्यात आली आहे. या सोहळ्यातील जोडप्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते तसेच व्यवसाय करू इच्छिणाºयांना कमी व्याजदरात कर्जही मिळवून दिले जाते. या विवाह सोहळ्यास शहर व जिल्'तील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन नववधुवरांना शुभार्शिवाद द्यावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेस उत्तर सोलापूर पं स़ सदस्य इंद्रजित पवार, शरद जाधव, धनंजय पाटील, दिलीप पतंगे, अमोल गायकवाड, प्रभाकर माने, जितेंद्र लाड, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत साळुंखे, राहुल जाधव, अ‍ॅड़ विश्वास देशमुख, अ‍ॅड़ सुजित देशपांडे, या विवाह सोहळ्याचे समन्वयक संदीप पिस्के, अमृता कल्याणी, राहुल कोल्हटकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नSubhash Deshmukhसुभाष देशमुख