शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सोलापुरात संचारबंदी; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद राहणार

By appasaheb.patil | Updated: April 19, 2020 22:59 IST

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश; कोरोना बाधित रुग्ण वाढल्याने प्रशासनाने घेतला निर्णय...

ठळक मुद्देसोलापुरात कोरोनाचे बाधित रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने घेतला निर्णयजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सोलापूर शहर पोलीस अलर्टसोलापूर शहर पोलिसांनी ठिकठिकाणी लावला बंदोबस्त

सोलापूर :  शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रविवारी दुसरा बळी गेला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोमवारी दुपारी दोन ते गुरुवारी रात्री १२ पर्यंत सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे.

या काळात केवळ अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने आणि पोलिस दलाचे काम सुरू राहणार आहे. शहरातील सर्व आस्थापना व शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे बँका, इतर सरकारी कार्यालय बंद असणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना यातून वगळण्यात आले आहे. सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

कोरोना प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित व्यक्तीकडून अन्य व्यक्तीला होण्याची शक्यता आहे त्यामुळे संचार बंदीचे आदेश देण्यात आले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. यांना आदेश लागू नसेल अत्यावश्य सेवा पुरवणारे खासगी, सरकारी रुग्णालये, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, कर्मचारी आणि त्यांची वाहने, रुग्णवाहिका, औषधांची दुकाने, पाणी पुरवठा, अग्निशामक, विद्यूत पुरवठा, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना हे आदेश लागू नाहीत. सकाळी सहा ते नऊ या वेळेत दूध वाटप व विक्री करता येईल. शहरातील पेट्रोल पंप सकाळी सात ते ११ या वेळेत सुरू राहतील. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, कर्मचारी, पोलिस यांना पेट्रोल, डिझेल मिळेल. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस