शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

सोलापूरातील स्टेडियमच्या गाळ्यांचे भाडे ठरविण्यासाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:34 IST

महापौरांनी घेतलेल्या बैठकीत झाला निर्णय, सुरक्षारक्षकाची नियुक्ती करणार

ठळक मुद्देमहापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्टेडियम कमिटीची बैठक३० गाळ्यांच्या भाडेकराराची मुदत संपलीक्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी बैठकीतील विषयांचे वाचन केले

सोलापूर : इंदिरा गांधी स्टेडियममध्ये असलेल्या ३० गाळ्यांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. या गाळ्यांचे भाडे ठरविण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय स्टेडियम कमिटीच्या बैठकीत  घेण्यात आला. 

महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्टेडियम कमिटीची बैठक झाली. बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह जिल्हा क्रीडाधिकारी, पोलीस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी बैठकीतील विषयांचे वाचन केले. यामध्ये स्टेडियमच्या बाहेर असलेल्या ३० गाळ्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे संबंधितांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

या गाळ्यांच्या भाडेवाढीच्या धोरणाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बाजारभावाप्रमाणे आढावा घेऊन भाडे ठरविण्यावर चर्चा झाली. पण बैठकीला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे उपस्थित नसल्याने महापौर बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून चर्चा करून निर्णय घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. 

नॅबचे कार्यालय, रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याचा कार्यक्रम, जिल्हा बँकेने घेतलेल्या कार्यक्रमाचे भाडे कमी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. क्रीडासंबंधित कार्यक्रमांना सवलत देता येते. नॅबचे कार्यालय व जिल्हा बँकेचा कार्यक्रम यासंबंधी नसल्याने भाड्यात सवलत देता येणार नाही, असे चर्चेअंती ठरविण्यात आले. स्टेडियमवरील हिरवळ वाढविण्यासाठी बोअरला पंप बसवून पाण्याची सोय व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. 

सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्टेडियमच्या सुरक्षेसाठी किती कर्मचारी आहेत, असा बैठकीच्या प्रारंभीच सवाल केला. क्रीडा अधिकारी शेख यांनी एक कर्मचारी असल्याचे सांगितल्यावर देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्टेडियमची भव्यता पाहता सुरक्षेसाठी कर्मचारी का नाहीत, असा सवाल केला. चर्चेअंती स्टेडियमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याचे ठरले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका