शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक; रूग्णांच्या आजारावर डॉक्टरांचे फोनवरून औषधयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 14:00 IST

लॉकडाऊनचा परिणाम: सर्दी, डोकेदुखीवरील उपचारासाठी सर्वाधिक कॉल्स

ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून फोनव्दारे रुग्णांना सल्ला देण्यात येत आहेरुग्णांची सोयही होत आहे.यासाठी निमा संघटनेच्या २२ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली फोनव्दारे रुग्णांना सल्ले देतात. प्रत्येक डॉक्टरांना दिवसाकाठी जवळपास वीस फोन येत असतात

सोलापूर : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घराच्या बाहेर निघणे हे खूप धोकादायक ठरत आहे. यामुळे शासनाच्या वतीने घराच्या बाहेर न निघण्याचे आवाहन करण्यात येत आहे; पण यामुळे ज्यांना आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत. अशा रुग्णांना मात्र अडचणीचे ठरत आहे.  सर्दी, डोकेदुखी, पोटदुखी अशा आजारांच्या रुग्णांसाठी डॉक्टरांच्या वतीने फोनवरून मोफत सल्ला देण्यात येत आहे.  दिवसाकाठी शेकडो रुग्णांना फोनमधून सल्ला देण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.  यामुळे काही वेळेपुरतेच दवाखाने उघडे असतात; पण यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या वतीने फोनवरून रुग्णांना सल्ला दिला जात आहे. काहीवेळा डॉक्टर हे रुग्णांना औषधे हे मेसेजव्दारे पाठवतात तर काही वेळेस त्यांना मेडिकलमधून फोन करण्यास सांगून औषधे दिली जातात. सल्ला देताना रुग्ण आपल्या ओळखीचा आहे का त्यानुसार त्यावर उपचार केले जातात. यावेळी काही साधारण आजाराचे लक्षण असणाºयांनाच फोनमधून औषधांचा सल्ला दिला जातो.

सर्वांना मोफत सल्ला- सध्या दिवसाकाठी एका डॉक्टरांना पंधरा ते वीस फोन येत असतात. त्या सर्वांना मोफत सल्ला दिला जातो. दररोज साधारणत: सर्दी, पोटदुखी, डोकेदुखी अशा आजारांचे डॉक्टरांना फोन येत आहेत. अशा रुग्णांना डॉक्टर हे फोनमधूनच सल्ला देतात व ज्या रुग्णांना प्रत्यक्षात पाहणे गरजेचे असते त्या रुग्णांना मात्र त्यांच्या घराजवळील क्लिनिकमध्ये दाखवण्याचा सल्ला दिला जातो.

गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून फोनव्दारे रुग्णांना सल्ला देण्यात येत आहे. यामुळे रुग्णांची सोयही होत आहे.यासाठी निमा संघटनेच्या २२ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते फोनव्दारे रुग्णांना सल्ले देतात. प्रत्येक डॉक्टरांना दिवसाकाठी जवळपास वीस फोन येत असतात. त्या सर्वांना मेसेजव्दारे औषधे दिली जातात.- डॉ. विनायक टेंभुर्णीकर, राष्ट्रीय अध्यक्ष निमा

माझे क्लिनिक हे दररोज उघडत असतो; पण  यानंतरही रुग्णांना काही त्रास होत असल्यास त्यांना फोनवरून सल्ला दिला जातो, यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी आहे. याचा खूप मोठा फायदा आहे. यामुळे रुग्णांचा  त्रासही लवकर बरा होण्यास मदत होत आहे.- डॉ. रुपेश येडके

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय