शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दिलासादायक; पंढरपूर‌ उपजिल्हा‌ रुग्णालयात वाचवला जातोय ४० टक्के ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 10:52 IST

डॉ. अरविंद गिराम यांची माहिती : ३९ रुग्णांना नॉन-रीब्रीथर मास्कचा वापर ...

पंढरपूर : सध्या कोरोना विषाणूने मोठा थैमान मांडला आहे. यामुळे रोज प्रत्येक शहरात शकडो व हजारो कोरोनाचे रुग्ण निष्पन्न होत आहेत. यामुळे संंबंध महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. अनेकांना ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात नॉन रीब्रीथर मास्कचा वापर करुन ४० टक्के ऑक्सीजन वाचवण्याचे काम वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम व त्यांच्या टिमकडून होत आहे.

पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ११५ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी ४६ ऑक्सिजन चालू आहे. डॉ. अरविंद गिराम यांचे २००९-१० मध्ये एका ठिकणी प्रशिक्षणासाठी गेले होते. या दरम्यान त्यांना ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या रुग्णांना योग्य प्रकारे, व आश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा कशा पध्दतीने केला जाईले यांचे मार्गदर्शन मिळाले होते. त्या दरम्यानच त्यांना नॉन रीब्रीथर मास्कचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते.

सध्या ऑक्सीजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. यामुळे नागरिकांना वेळत उपचार मिळत नाहीत. यामुळे त्यांनी ऑक्सीजनचा योग्य वापर व्हावा. यादृष्टीने उपजिल्हा रुग्णालयातील ३९ जणांना नॉन रीब्रीथर मास्क लावून ऑक्सीजन देण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. यामुळे ऑक्सीजन लावलेल्या रुग्ण श्वास घेता तेव्हा तो पिशवीमधून ऑक्सिजनमध्ये श्वास घेत आहात. मास्कच्या बाजूला असलेल्या वायुमधून श्वास बाहेर टाकलेली हवा बाहेर पडते आणि परत वातावरणात जाते. यामुळे ऑक्सीजन वाया जात नही. तसेच फक्त त्या माणसाच्या शरीरात ऑक्सीजनच जातो. या पध्दतीमुळे रोजच्या पेक्षा आता ४० टक्के ऑक्सीजन वाचला जात आहे. हे सर्व काम डॉ. अरविंद गिराम, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. सचिन वाळुजकर, डॉ. शिव कमल, परिचारिका जयश्री बोबले, रेखा ओंबासे, नाडगौडा करत आहेत.

::: आता फक्त ५० ऑक्सीजन सिलेंडर लागतात ::::उपजिल्हा रुग्णालयात ५० च्या आसपास कोरोना रुग्णांना रोज कृत्रिम ऑक्सीजनचा पुरवठा केला जात आहे. त्यासाठी किमान रोज ९० ऑक्सीजन सिलेंडरची आवश्यकता असते. परंतु नॉन रीब्रीथर मास्कचा वापर सुरु केल्यापासून तेवढ्याच रुग्णांना सध्या ५० ऑक्सीजन सिलेंडर लागत असल्याचे डॉ. अरविंद गिराम यांनी सांगितले.

नॉन-रीब्रीथर मास्क म्हणजे काय?नॉन-रीब्रीथर मास्क एक वैद्यकीय डिव्हाइस आहे जे आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन वितरीत करण्यात मदत करते. त्यात पिशवीत कनेक्ट केलेला फेस मास्क असतो जो ऑक्सिजनच्या एकाग्रतेने भरलेला असतो. पिशवी ऑक्सिजन टाकीशी जोडलेली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलPandharpurपंढरपूरcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन