शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

दिलासादायक; दिल्लीहून १ लाख ६२ हजार पोती तांदूळ सोलापुरात आला

By appasaheb.patil | Updated: April 25, 2020 09:34 IST

रेल्वे प्रशासनाची 'कोरोना' विरुद्ध लढाई; सोलापुरातील औषधे, मास्क, सॅनिटायझर मुंबई, पुणे, सिकंदराबादकडे पार्सल

ठळक मुद्देभारतीय रेल्वेची प्रवासी सेवा बंदअत्यावश्यक सेवेसाठी रेल्वेची मालवाहतूक सुरूरेल्वे प्रशासनाकडून रात्रंदिवस 'कोरोना' विरुद्धची लढाई सुरू

सुजल पाटील 

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन असताना या लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतुक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी काही एसटी व बसेस रस्त्यावर धावत आहेत. तसंच, रेल्वेही मालवाहतूक, पार्सल गाड्यांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा पुरवत आहे़ मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून मुंबई, पुणे, कलबुर्गी, सिकंदराबाद या प्रमुख शहरांना मास्क, सॅनिटायरझर, औषधे, पीपीई किटचा पुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय हरियाणाहून १ लाख ६२ हजार पोती तांदुळ सोलापुरात दाखल झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.कोरोनाशी लढायला लागणाºया सामग्रीची वाहतूक सुरु आहे. मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभागातून फक्त मालगाड्यांची आणि पार्सल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, काही पीपीई किटची वाहतूक केली जातेय. लॉकडाऊन काळात देशभरात १ हजार १५० टन औषधांचा पुरवठा केला आहे.दरम्यान, लॉकडाउन काळात शिधापत्रिका धारकांना गहू, तांदुळ व अन्य धान्यांचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न होत आहे़ रेल्वेने आलेला धान्यसाठा औद्योगिक वसाहतीत साठवण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.----------१२६ वॅगन तांदुळ सोलापुरात दाखल...

लॉकडाउनच्या काळात सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्रीय खाद्य निगमच्यावतीने ४९ वॅगनच्या तीन अशा १२६ वॅगनने (१ लाख ६२ हजार पोते ) तांदुळ सोलापूर रेल्वे स्थानकावर असलेल्या मालधक्यावर दाखल झाला आहे़ हा आलेला तांदुळ चिंचोळी एमआयडीसी, टिकेकरवाडी धान्यसाठा गोदाम व होटगी गोदामात ठेवण्यात आल्याची माहिती सोलापूर रेल्वे स्टेशन हुंडेकरी असोसिएशनचे सचिव बाबुराव घुगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.-----------------या आहेत विशेष पार्सल गाड्या...

मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्यावतीने राजकोट-कोईमतूर-राजकोट, मुंबई-वाडी-मुंबई, यशवंतपूर - निझामुद्दीन, निझामुद्दीन - यशवंतपूर या विशेष पार्सल गाड्या सोलापूर रेल्वे विभागातून नियमित धावत आहेत़ या पार्सल गाड्यांतून प्रवासी वाहतूक होता कामा नये यासाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) चे जवान तैनात करण्यात आले आहेत़ पार्सल वाहतुकीत औषधे, मास्क, सॅनिटायझरसह जीवनाश्यक वस्तुंना प्राधान्य देण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.-------------जीवनाश्यक वस्तू व पार्सल वाहतुकीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत़ आतापर्यंत ३१५ किलो औषधे, ३२० किलो मास्क, ११० किलो पीपीई किट, २१० किलो सॅनिटायझरचा पुरवठा सोलापुरातून करण्यात आला आहे़ मालवाहतूक गाड्या सुरूच आहेत़ पार्सलची संख्या वाढल्यास गाड्यांचीही संख्या वाढविण्यात येणार आहे.- प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर रेल्वे-------------सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात धान्यांचा तुटवडा भासू नये यासाठी माथाडी कामगार दिवस रात्र काम करून परराज्यातून रेल्वेने आलेले धान्य उतराई अन् पुन्हा ट्रकमध्ये चढाई करण्याचे काम करीत आहेत़ त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे व जिल्हा प्रशासन, कामगार आयुक्तांकडून मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करावा़ दरम्यान, माथाडी कामगारांना विमा कवच मिळवून द्यावे़- बाबुराव घुगे,सचिव - माथाडी कामगार, सोलापूर रेल्वे स्थानक

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या