शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

जातो माघारी पंढरीनाथा...!

By admin | Updated: July 11, 2014 01:42 IST

पंढरी ओसरू लागली: रेल्वेला गर्दी, एसटीची सेवा गैरसोयीची

पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाचे साजिरे रुप डोळ्यांत साठवून वारकऱ्यांसह भाविकांनी ‘जाता माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ असा कृतकृत्य झाल्याचा भाव मनी बाळगत गुरुवारी परतीचा मार्ग धरला. आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी बसने आणि रेल्वेने आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्य परिवहन महामंडळाने सुरुवातीपासून नियोजन करून राज्याच्या सहा विभागांतून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सोय करून ठेवली होती. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनानेही भाविकांसाठी जादा गाड्यांची सोय केली होती. यामुळे ३ ते ९ जुलैच्या दुपारी १ वाजेपर्यंत ७९ हजार ९७५ भाविक रेल्वेने परतले असल्याची माहिती रेल्वे पंढरपूर विभागाचे मुख्य वाणिज्य अधिकारी एम. के. गोसावी यांनी दिली.राज्य परिवहन महामंडळाची शहरातील दोन्ही बसस्थानके बंद ठेवण्यात आली होती. त्याऐवजी शहराबाहेर तात्पुरती बसस्थानके तयार करण्यात आली होती. यात्रा कालावधीसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या बसस्थानकांकडे रिक्षा व इतर वाहनांनी जाण्यासाठी जादा पैसे खर्च करावे लागत होते.आषाढी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात येणाऱ्या पालख्यांबरोबर गर्दी कमी आहे, असा अनेक जणांचा अंदाज असला तरी महाराष्ट्र परिवहन महामंडळावर याचा काही परिणाम झाला नाही. यावेळी बसच्या वाढीव खेपा देण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर रिंगण सोहळ्याच्या ठिकाणीही बस ये-जा करीत होत्या. गेल्यावर्षी आषाढी एकादशीच्या रात्री १२ वाजेपर्यंत ६२४२ फेऱ्या तर यंदा ७२८४ फेऱ्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी द्वादशीपर्यंत ३५ हजार ४०० प्रवासी तर यावर्षी ३६ हजार ४७० प्रवासी वाहतूक झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रताप सावंत यांनी दिली आहे.--------------------------रेल्वे प्रशासनानेही भाविकांसाठी जादा गाड्यांची सोय केली होती. यामुळे ३ जुलै ते बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत ७९ हजार ९७५ भाविक रेल्वेने परतले आहेत.- एम. के. गोसावी,मुख्य वा. अ., म. रेल्वे, पंढरपूर