शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

जिल्हाधिकारी म्हणाले; शक्तीदेवींच्या मिरवणुकांना बंदी; भक्तांना ऑनलाईन दर्शन घडवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 10:53 IST

नियमांचे भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा

सोलापूर : सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या मंडपात पाचपेक्षा अधिक भक्तांनी गर्दी करू नये. शक्तीदेवीच्या दर्शनाची व्यवस्था ऑनलाइन करा. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला बंदी असून, नियमांचे भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी काढलेल्या आदेशात दिला आहे.

गुरुवार ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने नवरात्रोत्सव साजरा करताना काही प्रतिबंधक नियमावली जाहीर केली आहे. नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका, तसेच स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारा. हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून त्यापद्धतीने मूर्तीची सजावट करावी. मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट, तर घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फूट असावी. शक्यतो मागील वर्षीप्रमाणे देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर मूर्तीचे पूजन करावे. मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे. घरी शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात. माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेची जनजागृती करावी. गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक शिबिरे, रक्तदान शिबिरे यांना प्राधान्य द्यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट, फेसबुक आदी माध्यमातून करावी. आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर भारतीय दंड संहितानुसार कारवाई करण्यात येईल, तसेच साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे...................

रावण दहनाच्या कार्यक्रमांना गर्दी कमी करण्याचे आवाहनआरती, भजन, कीर्तन हे धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक विसर्जनस्थळी जाणे टाळावे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. रावण दहणाच्या कार्यक्रमासाठी कमीत कमी व्यक्ती उपस्थित राहतील याची व्यवस्था करावी.

 

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्रीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस