अंनिसच्या जिल्हाध्यक्षपदी कॉ. तानाजी ठोंबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:55+5:302021-07-18T04:16:55+5:30

या बैठकीस सोलापूर, बार्शी, सांगोला, कुर्ड्वाडी, माळीनगर व करमाळा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी निवड करण्यात ...

Co. as the district president of Annis. Tanaji Thombre | अंनिसच्या जिल्हाध्यक्षपदी कॉ. तानाजी ठोंबरे

अंनिसच्या जिल्हाध्यक्षपदी कॉ. तानाजी ठोंबरे

या बैठकीस सोलापूर, बार्शी, सांगोला, कुर्ड्वाडी, माळीनगर व करमाळा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी निवड करण्यात येऊन त्यात जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्राचार्या दीपाताई सावळे (बार्शी) जिल्हा सचिव म्हणून डॉ. राजेंद्र सूर्यवंशी (सांगोला) यांची निवड केली गेली. कार्यवाह यशवंत फडतरे (सोलापूर) - बुवाबाजी संघर्ष विभाग, प्रा. गिरीष ढोक (माळीनगर )-वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प अंजली नानल (सोलापूर) सत्यभामा जाधवर (बार्शी) महिला विभाग, दत्तात्रय खंडेराव (सोलापूर) ,विविध उपक्रम, सरिता मोकाशी (सोलापूर , जात निर्मूलन व जोडीदाराची विवेकी निवड, डॉ. सीमा गायकवाड (सांगोला) सोमनाथ वेदपाठक (बार्शी) ,युवा व विवेकवाहिनी, विजय माने (सांगोला) विठ्ठलराव वठारे (सोलापूर) सोशल मीडिया, डॉ. सुरेश व्यवहारे (सोलापूर) मानसिक आरोग्य, काकासाहेब गुंड (बार्शी) कायदेशीर सल्लागार, सुजाता पाटील (सांगोला) सांस्कृतिक विभाग, डॉ. एस. के. पाटील (सांगोला), वार्तापत्र व निधी संकलन, कॉ. रवींद्र मोकाशी (सोलापूर), डॉ. प्रभाकर माळी( सांगोला), डॉ. नभा काकडे (सोलापूर) डॉ. जम्मा (सोलापूर) यांची जिल्हा सल्लागार म्हणून निवड झाली. राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा. डॉ. अशोक कदम (बार्शी) राज्य सल्लागार म्हणून निशाताई भोसले (सोलापूर) व प्रा. हेमंत शिंदे ( बार्शी) यांची नियुक्ती झाली आहे. राज्य कार्यकारिणी सदस्य मुक्ता दाभोळकर व हमीद दाभोळकर यांनी या सर्व नूतन जिल्हा कार्यकारिणीच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक कदम तर प्रास्ताविक निशाताई भोसले व आभार विनायक माळी यांनी केले.

Web Title: Co. as the district president of Annis. Tanaji Thombre