शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

बार्शीत तूर हमीभाव खरेदी केंद्र बंद, शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 11:31 IST

बार्शी शहरतील सर्वच गोदामे झाले पॅक, तूर ठेवायला जागा नाही; १२५० शेतकºयांच्या तूर खरेदीचा प्रश्न

ठळक मुद्देकेंद्र व राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत राज्यात नाफेडच्या मदतीने हमीभाव खरेदी केंद्रे सुरुबार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

शहाजी फुरडे-पाटीलबार्शी : गोदाम पॅक झाल्याने येथील शासकीय तूर खरेदी केंद्र गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने १२५० शेतकºयांच्या तूर खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील तूर हमीभाव केंद्रात आतापर्यंत २४० शेतकºयांची २५२९ क्ंिवटल तूर खरेदी केल्यानंतर आता यापुढील तूर ठेवण्यासाठी गोदामात जागाच नाही. 

 केंद्र व राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत राज्यात नाफेडच्या मदतीने हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केली़ मात्र ती खरेदी केंद्रेदेखील बहुतांश शेतकºयांनी बाजारात कमी भावाने तूर विक्री केल्यानंतर सुरु केली आहेत़ बार्शीत १२ फेब्रुवारी २०१८ रोजी तूर हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले. हे केंद्र केवळ १५ दिवसच सुरु राहिले. या केंद्रासाठी सुमारे १५०० शेतकºयांनी आॅनलाईन पद्धतीने खरेदीची नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी ३३५ शेतकºयांना तूर विक्रीसाठी आणण्याचा मेसेज पाठविण्यात आला. त्यापैकी २४० शेतकºयांची ५ हजार ५८ कट्टे तूर खरेदी झाली. आता गोदामात जागा नसल्याची अडचण पुढे येत आहे. 

त्यामुळे खरेदी केलेली तूर कुठे ठेवायची, हा प्रश्न केंद्रास पडला आहे. बाजार समितीच्या वतीने तहसीलदार व वखार महामंडळाकडे याबाबत लेखी मागणी करुन गोडावून उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे़ तरीदेखील गोडावून उपलब्ध करुन दिलेले नाही़ ही तूर सोलापूर किंवा इतरत्र बाहेर घेऊन जाणे हे वाहतुकीच्या दृष्टीने परवडत नाही़ 

अद्याप शेतकºयांनाही पेमेंट नाही खरेदी केंद्रावर खरेदी केलेला माल वेअरहाऊसला जाऊन त्यांनी नाफेडला कळविल्याशिवाय शेतकºयांना पेमेंटदेखील काढता येत नाही़ खरेदी केलेला माल तसाच पडून असल्यामुळे अद्याप एकाही शेतकºयाला पैसे दिलेले नाहीत़ एकीकडे शासन खरेदीचा वेग वाढवा असे म्हणत आहे तर दुसरीकडे माल ठेवण्यासाठी गोडावूनची उपलब्धता करुन दिली जात नाही़ प्रशासकासह राजकीय नेत्यांचे लक्ष नाही - बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती आहे़ प्रशासक असलेले बालाजी कटकधोंड हे आठवड्यातून एक-दोनदा तेही सायंकाळच्या दरम्यान बाजारात येतात. त्यामुळे त्यांचेही बाजारात काय सुरु आहे, याकडे अजिबात लक्ष नाही़ तसेच बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या कोणत्याच पक्षाच्या नेत्यालादेखील खरेदी केंद्रावर काय सुरु आहे याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही़ 

संथगतीने काम सुरु- बार्शीच्या केंद्रावर दोन चाळणी यंत्रे आहेत़ याचा विचार केला तर साधारणपणे दररोज एक हजार क्विंटल तूर खरेदी होणे अपेक्षित आहे़ केंद्रावर संथगतीने काम सुरु असून, असेच काम राहिले तर नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करायला चार महिन्यांचा कालावधी लागेल आणि इतके दिवस शासन खरेदी केंद्र सुरु करणार आहे का? हा मोठा प्रश्न आहे़

पणन मंत्र्यांनी लक्ष घालावे - राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख हेदेखील याच जिल्ह्यातील आहेत. आता त्यांनीच या प्रकरणी लक्ष घालून वेगाने तूर खरेदी होण्यासाठी बार्शीच्या केंद्रावर खरेदी होत असलेली तूर ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करुन देण्याकामी लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत़ 

खरेदी केंद्रावरील तूर ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करुन द्यावे अशा मागणीचे पत्र आम्ही एक महिन्यापूर्वी तहसील कार्यालयाकडे दिले आहे़ तसेच जिल्हा पुरवठा अधिकाºयांशीदेखील बोलणे झाले आहे़ आम्ही आमच्या गोदामातील धान्याची वारफेर करुन आणखी दोन हजार कट्ट्यासाठी जागा तयार केली आहे़ -सुहास घोडके, साठा अधीक्षक वखार महामंडळ, बार्शी 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSubhash Deshmukhसुभाष देशमुखAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarket Yardमार्केट यार्ड