लाच घेताना लिपिक अटकेत
By Admin | Updated: May 6, 2017 03:49 IST2017-05-06T03:49:58+5:302017-05-06T03:49:58+5:30
अंतरजातीय विवाह केल्यानंतर मिळणारे अनुदान देण्यासाठी घेतलेली मूळ कागदपत्रे परत देण्यासाठी ५०० रुपयांची

लाच घेताना लिपिक अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : अंतरजातीय विवाह केल्यानंतर मिळणारे अनुदान देण्यासाठी घेतलेली मूळ कागदपत्रे परत देण्यासाठी ५०० रुपयांची
लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा लिपिक शामल सायण्णा आढकूल (वय ४६, रा़ ११/६३, उजनी कॉलनी, सोलापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराने अंतरजातीय विवाह केला असून त्याअंतर्गत मिळणारे ५० हजार रूपयांचे अनुदान मिळविण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता़ त्यांना मार्च २०१७ मध्ये अनुदान मिळाले़ मात्र, प्रस्तावासोबतची मूळ कागदपत्रे परत देण्यासाठी आढकूल यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व अढलूक यांना अटक केली़