कुर्डूवाडीत स्वच्छतेचा होतोय जागर ! नगरपरिषदेचा उपक्रम : आठवडा बाजारातील कचरा रात्रीच उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:37 PM2017-11-23T15:37:14+5:302017-11-23T15:41:28+5:30

नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण- २०१८ हे मिशन हाती घेतले असून, शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छतेचा जागर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Cleanliness is happening in Kurduvadi! Municipal Council Program: Weekly market waste will take place at night | कुर्डूवाडीत स्वच्छतेचा होतोय जागर ! नगरपरिषदेचा उपक्रम : आठवडा बाजारातील कचरा रात्रीच उचलणार

कुर्डूवाडीत स्वच्छतेचा होतोय जागर ! नगरपरिषदेचा उपक्रम : आठवडा बाजारातील कचरा रात्रीच उचलणार

Next
ठळक मुद्दे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक पथके कार्यरतनगरपरिषदेचे एक पाऊल पुढे तर शहरवासीयांनी दोन पावले पुढे टाकून सहकार्य करावे : समीर मुलाणीच्नगरपरिषदेकडून स्वच्छतेबाबत इंजिनिअर्स अ‍ॅप आणि स्वच्छता अ‍ॅप नागरिकांच्या सोयीसाठी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
कुर्डूवाडी दि २३  : नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण- २०१८ हे मिशन हाती घेतले असून, शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छतेचा जागर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक पथके कार्यरत असून, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, दवाखाने, उद्योगधंदे आदी ठिकाणी पथकातील अधिकारी, कर्मचारी स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगणार असल्याचे मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरात आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांच्या मार्गदर्शनाखाली खास नियोजन करण्यात आले असून, दिवसा रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून आठवडा बाजारातील कचरा रात्री ८ ते १० या वेळेत उचलला जाणार आहे. शहराचे मुख्य ५ विभाग करण्यात आले असून, या भागासाठी दोन मुकादम नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या निरीक्षणात सर्व मुख्य रस्ते, उपरस्ते झाडण्यात येत आहेत. 
स्वच्छ शहर सर्वेक्षण २०१८ मध्ये शहरातील ५ वॉर्डात ५ घंटागाड्या प्रत्येक गाडीत एक कर्मचारी व चालक यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
सुका व ओला कचरा याचेही नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी, व्यावसायिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करुन दिला नाही तर तो कचरा स्वीकारणार नाही, असेही मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी सांगितले.
------------------------------
स्वच्छता अ‍ॅप कार्यरत
च्नगरपरिषदेकडून स्वच्छतेबाबत इंजिनिअर्स अ‍ॅप आणि स्वच्छता अ‍ॅप नागरिकांच्या सोयीसाठी कार्यान्वित करण्यात आले असून, या अ‍ॅपवरच नागरिकांनी आपल्या भागातील तक्रारी, समस्या फोटो व नावासह दाखल करु शकतात. त्यानंतर या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गावडे म्हणाले.
----------------------------
नगरपरिषदेचे एक पाऊल पुढे तर शहरवासीयांनी दोन पावले पुढे टाकून सहकार्य करावे. स्वच्छतेच्या मिशनमध्ये नगरपरिषदेने यशस्वी होण्याचा आणि प्रथम तीन क्रमांकात येण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी, युवक-युवती, महिला, उद्योजक, डॉक्टर आदींनी सहकार्य करावे. साºयांनी ‘स्वच्छ कुर्डूवाडी-सुंदर कुर्डूवाडी’चा संकल्प करावा. 
-समीर मुलाणी, नगराध्यक्ष

Web Title: Cleanliness is happening in Kurduvadi! Municipal Council Program: Weekly market waste will take place at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.