साठे वस्तीत दोन गटात हाणामारी

By Admin | Updated: June 15, 2014 00:55 IST2014-06-15T00:55:41+5:302014-06-15T00:55:41+5:30

८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Clashes in two groups in Sathe | साठे वस्तीत दोन गटात हाणामारी

साठे वस्तीत दोन गटात हाणामारी


सोलापूर : डोणगाव रोडवरील साठे वस्तीमध्ये दोन गटात हाणामारीचा प्रकार शुक्रवारी रात्री ८़३० वाजता घडला़ या घटनेत दोन्ही गटातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़
अण्णासाहेब दिलीप साठे (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय शिवाजी साठे, इंदुमती शिवाजी साठे, सुषमा उत्तरेश्वर पाटील अशा तीन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़
या लोकांना अण्णासाहेब साठे यांनी स्वत:च्या शेतामध्ये म्हशी चरण्यास का सोडता याचा जाब विचारल्याने त्यांनी शिवीगाळ, दमदाटी केली़ तसेच विजय साठे याने अण्णासाहेब, वडील दिलीप साठे आणि केशरबाई डोंगरे यांना लोखंडी सळईने मारहाण केली़ याचा तपास फौजदार पाटील करीत आहेत़
तसेच दुसऱ्या घटनेत सुषमा उत्तरेश्वर पाटील (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिलीप साठे, अण्णासाहेब साठे, सुरेखा साठे, सोनाली साठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़
सुषमा यांच्या आईने आमच्या शेतात म्हशी का सोडता आणि बहिणीस त्रास का देता याचा जाब विचारल्याने चिडले़ यावेळी आरोपींनी सुषमा यांच्या आईच्या डोक्यावर गवत कापण्याच्या विळ्याने वार करुन जखमी केले़
सुषमा आणि त्यांची बहिण व भाऊ सोडवायला गेले असता अण्णासाहेब साठे याने ब्लेडने वार केले़ तसेच इतर आरोपींनी लाकडाने मारहाण केली़ याचा तपास फौजदार भाबड यांनी केला.

Web Title: Clashes in two groups in Sathe