Civil felicitation of Ajinkyarana Patil at Kuranwadi | कुरणवाडीत अजिंक्यराणा पाटील यांचा नागरी सत्कार

कुरणवाडीत अजिंक्यराणा पाटील यांचा नागरी सत्कार

अनगर : वाढदिवसानिमित्त मोहोळ पंचायत समितीचे सदस्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांचा कुरणवाडी येथे नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी राणा उद्योग समूहाचे चेअरमन भारत जाधव, माजी सरपंच सज्जन खोत, शंकर शिंदे, नानासाहेब चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी त्यांचे औक्षण झाले. २९ वा वाढदिवस असल्याने २९ किलोचा केक व २९ किलोचा हार घालून अजिंक्यराणा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शोभेच्या दारुकामची रोषणाई होती.

यावेळी अजिंक्यराणा पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

यावेळी वक्ते तुकाराम मस्के यांनी अजिंक्यराणा पाटील यांच्या कार्यावर गौरवोद्गार काढले.

यावेळी सरपंच गणेश जाधव, माजी सरपंच नारायण गुंड, आगतराव गुंड, संभाजी थिटे, पिराजी गुंड, विठ्ठल थिटे, भाऊसाहेब पासले, सचिन जाधव, चेअरमन रणजित थिटे, तात्या गायकवाड उपस्थित होते. (वा. प्र.)

---

फोटो : २३ अनगर कुरणवाडी

अजिंक्यराणा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना गणेश जाधव, भारत जाधव, सज्जन खोत,शंकर शिंदे, नानासाहेब चव्हाण, भाऊसाहेब पासले.

Web Title: Civil felicitation of Ajinkyarana Patil at Kuranwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.