पाणीपट्टी, घरपट्टी करवसुलीस नागरिकांचा प्रतिसाद थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:23 IST2021-04-01T04:23:20+5:302021-04-01T04:23:20+5:30
सांगोला नगरपरिषदेने शहर व उपनगरातील नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी व गाळाभाडे वसुलीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून नोटीसा पाठविल्या होत्या. गतवर्षी कोरोना ...

पाणीपट्टी, घरपट्टी करवसुलीस नागरिकांचा प्रतिसाद थंड
सांगोला नगरपरिषदेने शहर व उपनगरातील नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी व गाळाभाडे वसुलीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून नोटीसा पाठविल्या होत्या. गतवर्षी कोरोना कालावधीत लाँकडाऊनमुळे मार्च महिन्यात नगरपरिषदेस कर वसुलीचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे नागरिकांकडे चालू थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी मालमत्ताधारकांकडील मार्चअखेर थकबाकी व चालू बाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली.
नगरपरिषदेकडून झालेली करवसूली
सांगोला शहर व उपनगरात सुमारे १३,३६५ मालमताधारकांकडील ४ कोटी ५ लाख ७ हजार रूपयांपैकी २ कोटी १ लाख २३ हजार २३ रुपये तर ५,६०० नळकनेक्शन धारकांकडील ३ कोटी ६ लाख ८५ हजार पाणीपट्टीपैकी १ कोटी ६६ लाख ८७ हजार ५८१ रुपयांची बाकी भरली आहे. तर ३६४ गाळेधारकांकडील १ कोटी १७ लाख ३२ हजार ४६१ रुपयांपैकी ५० लाख ७२ हजार ७७९ रुपये व खुल्या जागा भाड्यापोटी ४३ लाख १५ हजार ५५७ पैकी १५ लाख ४२ हजार १८५ असे एकूण ४ कोटी ३४ लाख २५ हजार ५३८ रुपये करापोटी जमा झाल्याचे कार्यालयीन अधीक्षक शरद माने यांनी सांगितले.
कोट ::::::::::::::::::
मार्च महिना जरी संपला असला तरी नगरपरिषदेकडून कर वसुली मोहीम पुढील कालावधीत चालू राहणार आहे. अद्याप कर न भरणाऱ्या थकबाकीदारांनी आपल्याकडील कर भरणा तत्काळ करून होणारी कारवाई टाळावी.
- कैलास केंद्रे
मुख्याधिकारी, सांगोला