न्याय मिळेपर्यत लढा सुरु ठेवण्याचा नागरिकांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST2021-07-20T04:17:10+5:302021-07-20T04:17:10+5:30

अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे, या मागणीसाठी तीन गावच्या नागरिकांनी अकलूज प्रांताधिकारी कार्यालयासमोर २२ जूनपासून ...

Citizens' determination to continue fighting till justice is done | न्याय मिळेपर्यत लढा सुरु ठेवण्याचा नागरिकांचा निर्धार

न्याय मिळेपर्यत लढा सुरु ठेवण्याचा नागरिकांचा निर्धार

अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे, या मागणीसाठी तीन गावच्या नागरिकांनी अकलूज प्रांताधिकारी कार्यालयासमोर २२ जूनपासून साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे. आज २८ व्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, कृष्णा-भीमा विकास आघाडीचे अध्यक्ष विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, ग्रा.पं.चे सदस्य संजय साठे, दादा तांबोळी, तनवीर तांबोळी, ॲड. रणजित भोसले, महेश सूर्यवंशी, सलिम सय्यद, शैलेश दिवटे, विठ्ठल खंडागळे, भैया माढेकर यांच्यासह फोटोग्राफी संघटना, लाकूड असोसिएशन, बुरूड समाज, विकासनगर, जोशी गल्ली, लोणार गल्ली, लोहार गल्ली, इंदिरानगर, हनुमाननगर, हनुमान तालीम येथील नागरिक सहभागी झाले होते.

190721\img-20210719-wa0037.jpg

अकलुज नगरपरीषद व नातेपुते नगरपंचायत करावी मागणीसाठी निवेदन देताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, कृष्णा भिमा विकास आघाडीचे अध्यक्ष विश्वतेजसिंह मोहिते पाटील व इतर

Web Title: Citizens' determination to continue fighting till justice is done