मोहोळमध्ये रस्ता ओलांडताना कारच्या धडकेत चिमुकली ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:18 IST2020-12-09T04:18:00+5:302020-12-09T04:18:00+5:30
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरातील सोमराय नगर येथे अंतर्गत रस्ता आहे. या ठिकाणी संचिता संजय कळवसे (वय, ...

मोहोळमध्ये रस्ता ओलांडताना कारच्या धडकेत चिमुकली ठार
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरातील सोमराय नगर येथे अंतर्गत रस्ता आहे. या ठिकाणी संचिता संजय कळवसे (वय, ७ वर्ष, रा. माळीनगर, अकलूज, ता. माळशिरस) ही मुलगी खेळत होती.? मंगळवारी दुपारी (दि. ८) पावणेतीन वाजण्याच्या सुमारास तिचे आजोबा नागनाथ रामचंद्र आनंतकर (रा. सोमरायनगर, मोहोळ) यांच्याकडे ती रस्ता ओलांडून जात होती.? दरम्यान, मोहोळ एसटी स्टॅण्डकडून सोमरायनगरमधील अंतर्गत रस्त्याने जाणाऱ्या (एमएच ०२ ईयू ५२५६) या कारने तिला जोराची धडक दिली. यामध्ये संचिताच्या डोक्यास व दोन्ही पायात गंभीर मार लागल्याने ती बेशुद्ध पडली. तिला नातेवाइकांनी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या अपघात प्रकरणी कारचालक सिद्धेश्वर बापूसाहेब हजारे (रा. सोमरायनगर, मोहोळ) यांच्याविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदला आहे. पुढील तपास पोलीस आहेत.
----