शिंगेवाडीत ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळल्याने चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:38 IST2020-12-12T04:38:05+5:302020-12-12T04:38:05+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शंकरचे वडील पांडुरंग यांनी नेहमीप्रमाणे आपले दिवसभराचे शेतीचे काम उरकून ट्रॅक्टर शेतातील विहिरीच्या बाजूला लावला ...

शिंगेवाडीत ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळल्याने चिमुकल्याचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शंकरचे वडील पांडुरंग यांनी नेहमीप्रमाणे आपले दिवसभराचे शेतीचे काम उरकून ट्रॅक्टर शेतातील विहिरीच्या बाजूला लावला होता. ट्रॅक्टर लावलेल्या ठिकाणची जमीन भुसभुशीत झालेली आणि पाणी दिल्याने ओलसर झाली होती. त्यामुळे जमीन खचली आणि बाजूला उताराला असलेला ट्रॅक्टर अन् त्यावरील मुलगा थेट विहिरीत जाऊन कोसळला. त्यानंतर गावातील नागरिक व नातेवाइकांच्या मदतीने विहिरीतील पाणी काढल्यानंतर पाच ते सहा तासांनी त्या बालकाचा मृतदेह व टॅक्टर बाहेर काढण्यात आला. कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी पहाटे २ वाजता शंकरचे शवविच्छेदन करण्यात आले. शंकरच्या मृत्यूने शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात शंकरच्या दुर्दैवी मृत्यूचे वृत्त पसरताच शोकाकुल वातावरण पसरले. याबाबत कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.
फोटो
११शंकर शिंदे