अन् उसाच्या फडातच गेला चिमुकलीचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST2021-01-13T04:56:31+5:302021-01-13T04:56:31+5:30
अधिक माहिती अशी, शिवलिंगप्पा विजापुरे यांच्या शेतातील तोडलेले ऊस नंजू पुनप्पा संगदरे (रा. अंकलगी) यांच्या ट्रॅक्टरच्या ...

अन् उसाच्या फडातच गेला चिमुकलीचा जीव
अधिक माहिती अशी, शिवलिंगप्पा विजापुरे यांच्या शेतातील तोडलेले ऊस नंजू पुनप्पा संगदरे (रा. अंकलगी) यांच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली एमएच १३ सीए ६७२८ यामध्ये भरत होते. ऊसतोड कामगार शिवाजी चव्हाण (मूळगाव, करजखेडा, ता. तुळजापूर जि उस्मानाबाद) यांनी आपल्या ४ वर्षाच्या बालिकेला उसाच्या फडात झोपवले होते. त्यावेळी शिवलिंगप्पा विजापुरे यांचा मुलगा धोंडेश विजापुरे हा आरटीओ पासिंग न केलेला बिगर नंबरचा ट्रॅक्टर घेऊन आला. यावेळी उपस्थित ऊसतोड कामगारांनी लहान मुले झोपले आहेत, ट्रॅक्टर घेऊन येऊ नकोस, असे धोंडेशकडे पाहत ओरडले, पण धोंडेश ट्रॅक्टरमध्ये टेपची गाणी ऐकत फडात ट्रॅक्टर घेऊन आला. त्याचवेळी शेतामध्ये झोपलेल्या पल्लवी चव्हाण हिच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना ट्रॅक्टर चालक धोंडेश विजापुरे याला कळताच तो ट्रॅक्टर सोडून पळून गेला.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक छबू बेरड हे करीत आहेत.