कमी मार्क पडले म्हणून मुलाची आत्महत्या
By Admin | Updated: June 20, 2014 00:51 IST2014-06-20T00:51:54+5:302014-06-20T00:51:54+5:30
विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजता जुनी मिल चाळीत घडली.

कमी मार्क पडले म्हणून मुलाची आत्महत्या
सोलापूर : दहावीत कमी मार्क पडले म्हणून निराश झालेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजता जुनी मिल चाळीत घडली.
शुभम मोहन पाटील (वय १६, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने जुनी मिल कंपौड येथील संभाजीराव शिंदे प्रशालेतून दहावीची परीक्षा दिली होती. नुकताच निकाल लागल्यावर त्याला ७0 टक्के गुण मिळाले होते. पण अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून तो निराश झाला होता. १९ जून रोजी दुपारी साडेचार वाजता घरातील छताच्या वाश्याला त्याने दोरीने गळफास घेतला. ही बाब निदर्शनाला आल्यावर त्याला उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तो उपचारापूर्वीच मरण पावला होता. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. शुभम हा आईवडिलांना एकुलता होता. तो वर्गात हुशार होता. पण कमी मार्क पडल्याचा धक्का त्याला सहन झाला नाही असे घरच्यांनी पोलिसांना सांगितले.