शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लेकरं घरात राहिली, संकट टळलं; कोरोनाच्या भितीनं मुलं संसर्गापासून दूर राहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:35 IST

चांगली बातमी; सोलापूर जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण घटले

राजकुमार सारोळे

सोलापूर : कोरोना साथीच्या काळात जिल्ह्यात बालमृत्यूच्या प्रमाणात  घट झाल्याचे  दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सन २०२०  मध्ये २३७ ने बालमृत्यूमध्ये घट झाली आहे.    जन्मत: ते १४ वर्षांपर्यंतच्या बालकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे जन्मल्यानंतर ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना वेळेत लसीकरण करणे गरजेचे आहे. 

० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर, कावीळ, डायरिया, अतिसार, मेंदूदाह, न्यूमोनिया, मलेरिया, डेंग्यू या आजारांना सामना करावा लागतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. बालकांच्या लसीकरणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून अशा बालकांचे सर्वेक्षण करून लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे पार पडला जातो. तरीही बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त       आहे. साथीच्या आजारापेक्षा जन्मत: व्यंग असलेली बालके याला बळी पडतात. त्यानंतर गोवर, कावीळ, न्यूमोनियामुळे मुले दगावतात, पण मार्च २०२० नंतर कोरोना साथीच्या प्रभावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला व शाळा सुरू नसल्याने साथीच्या आजाराचे प्रसारण थांबले. मुले घराबाहेर पडली नाहीत तसेच मास्कच्या वापरामुळे आजारी पडण्याचे प्रमाण घटले. यामुळे या काळात बालमृत्यूचे प्रमाणही बरेच खाली आल्याचे आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून  दिसून येत आहे. 

न्यूमोनियाचा प्रभावन्यूमोनिया, कावीळ, गोवर यामुळे मुले दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचबराेबर जन्मत: व्यंग, कमी वजन, कमी दिवस, ॲशफॅक्सिया,मेंदूदाह यामुळे बालमृत्यू होतात. न्यूमोनिया व गोवर हे संसर्गजन्य आजार आहेत.

मुले घरातच राहिल्याने संसर्ग टळलाकाेरोना साथीमुळे मुलांना घरातच राहावे लागले. बाहेर पडताना मास्कचा वापर केल्याने संसर्ग झाला नाही. याशिवाय शाळाच नसल्याने मुले संसर्गापासून दूर राहिली. मास्कच्या वापराने सर्दी, खोकला असे आजार झाले नाहीत. 

मास्कचा वापर व मुले घराबाहेर न पडण्यामुळे संसर्ग टळला. अंगणवाडी, शाळा बंद असल्याने मुले एकत्र आली नाहीत हा महत्त्वाचा फॅक्टर ठरला. न्यूमोनिया, गोवर हा अतिसांसर्गिक आहे. मुले घरातच राहिल्याने हा फायदा झाल्याचे दिसत आहे.- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी.

संसर्ग, डायरिया, न्यूमोनिया या तीन प्रमुख कारणांमुळे बालके मृत्युमुखी पडतात. कोरोनामुळे लहान मुलांसह मोठ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे संसर्गामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले. कावीळ, डेंग्यूचे प्रमाण कमी झाले आहे. - डॉ. अतुल कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलchildren's dayबालदिनHealthआरोग्य