गादेगावात बालविवाह रोखला<bha>;</bha> मुलीच्या कुटुंबांचे केले मनपरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:22 IST2020-12-29T04:22:13+5:302020-12-29T04:22:13+5:30

गादेगाव (ता. पंढरपूर) येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिसंगी येथील युवकाशी होणार असल्याची गोपनीय माहिती निर्भयापथक प्रमुख पोलीस ...

Child marriage stopped in Gadegaon <b> bha;; </bha> | गादेगावात बालविवाह रोखला<bha>;</bha> मुलीच्या कुटुंबांचे केले मनपरिवर्तन

गादेगावात बालविवाह रोखला<bha>;</bha> मुलीच्या कुटुंबांचे केले मनपरिवर्तन

गादेगाव (ता. पंढरपूर) येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिसंगी येथील युवकाशी होणार असल्याची गोपनीय माहिती निर्भयापथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांना मिळाली. निर्भया पथक तत्काळ घटनास्थळी पोहचले. मुलीच्या वयाबाबत खात्री केल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्या मुलीस तिच्या आईसोबत ताब्यात घेऊन पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तज्ज्ञांकडून समुपदेशन केले. बालविवाह कायदेशीररीत्या गुन्हा असल्याचे समजावून सांगितले. व त्यांचे मतपरिवर्तन केले.

पोलीसपाटील ठेवणार लक्ष

हा बालविवाह न करता मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्याचे हमीपत्र लिहून घेऊन गावातील प्रतिष्ठित नागरिकांमार्फत मुलीच्या कुटुंबांचे मनपरिवर्तन केले. तसेच तिसंगी व गादेगाव येथील पोलीसपाटील यांना या कुटुंबीयांवर लक्ष ठेवण्याबाबत लेखी समजपत्र व सूचना दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले.

----

Web Title: Child marriage stopped in Gadegaon bha;;