उजनी जलाशयात बालकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST2021-07-20T04:17:19+5:302021-07-20T04:17:19+5:30
याबाबत माहिती अशी की, कुंदन शिवाजी गायकवाड (वय-११) हा पुणे येथे आई-वडीलाकडे असतो. तो १५ जुलैला त्याचे आजोबाकडे केत्तूर ...

उजनी जलाशयात बालकाचा बुडून मृत्यू
याबाबत माहिती अशी की, कुंदन शिवाजी गायकवाड (वय-११) हा पुणे येथे आई-वडीलाकडे असतो. तो १५ जुलैला त्याचे आजोबाकडे केत्तूर नं. २ येथे आला होता. १७ जुलैला सायंकाळी साडेचार-पाच वाजता त्यांचे मित्राबरोबर सायकलवर उजनीकडे फिरावयास गेला. त्याच्या मित्रांनी कपडे काढून ते पोहू लागले. कुंदनला पोहता येत नाही, हे तो विसरला आणि तो ही कपडे काढून पोहू लागला. पण पोहता येत नसल्याने तो बुडाला.
मित्रांनी ही हकीकत कोणालाच सांगितली नाही. कुंदन घरी आला नाही हे पाहून त्यांच्या आजोबांनी शोध घेतला असता, उजनीतील पुलाजवळ त्याची सायकल व कपडे दिसले. त्यानंतर मच्छीमार बांधव महादेव नगरे,संतोष गायकवाड, अशोक साळवे, महादेव गुंजाळ यांनी कुंदनचा मृतदेह काढला.
---
१९ कुंदन गायकवाड