शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुख्यमंत्री इफेक्ट: सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे मनोमिलन होणार, तयारी अंतिम टप्प्यात, १३ जानेवारीच्या कार्यक्रमाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:21 IST

मनपातील गटबाजीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत वर्षा निवासस्थानावर दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत केलेल्या फटकेबाजीचा परिणाम लागलीच दिसून येत आहे.

ठळक मुद्दे१३ जानेवारी रोजी मनोमीलनाचा कार्यक्रम घेण्याची तयारीमुख्यमंत्र्यांच्या झापाझापीचा इफेक्ट गुरूवारी दिसून आलापालकमंत्री कार्यालयाने मनोमीलनासाठी १३ जानेवारीचा मुहूर्त धरून शांतीसागर मंगल कार्यालयात कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १२ : मनपातील गटबाजीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत वर्षा निवासस्थानावर दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत केलेल्या फटकेबाजीचा परिणाम लागलीच दिसून येत आहे. सोलापुरात गुरूवारी आल्याआल्याच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी १३ जानेवारी रोजी मनोमीलनाचा कार्यक्रम घेण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन गटबाजीबाबत घेतलेल्या झाडाझडतीचा आज सोलापुरात चर्चेचा विषय बनला. शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी मनपात चाललेल्या राजकारणावर केलेल्या टिप्पणीवर नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी खरमरीत उत्तर दिले. पक्षाचे अध्यक्ष म्हणून निंबर्गी यांच्या नैतिक जबाबदारीवर त्यांनी ओरखडे ओढले. नागेश वल्याळ यांनी व्हिप घेतला नाही. सभागृहनेता सुरेश पाटील आजारी असताना प्रशासनातील तरतुदीनुसार प्रभारीची नियुक्ती कोणाकडे असावी, हे ठरलेले असताना विनाकारण राजकारण केले गेले. महिला सदस्यांनी या राजकारणामुळे अडचणी कशा वाढल्या आहेत, हे निदर्शनाला आणले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गटाबाजीबाबत वृत्तपत्रातून येणाºया बातम्यांकडे लक्ष वेधून जबाबदारी झटकणाºयांबाबत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही मंत्र्यांकडे बघून तुम्ही संपवायला हवे. पक्षाची बदनामी होत आहे. तुम्ही अधिक निधी मागण्यासाठी भांडा. पक्षाचे व्हिप पाळा. दोन मंत्री, मनपा कॅबिनेट, शहराध्यक्ष व एक ज्येष्ठ नगरसेवक अशी कोअर कमिटी करून प्रश्न तेथेच सोडवा, अशी सूचना केली. तीन महिने कारभार पाहूनच पुढील निधी दिला जाईल, अशी तंबी दिली. मुख्यमंत्र्यांच्या झापाझापीचा इफेक्ट गुरूवारी दिसून आला. पालकमंत्री कार्यालयाने मनोमीलनासाठी १३ जानेवारीचा मुहूर्त धरून शांतीसागर मंगल कार्यालयात कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमाची निमंत्रणे सर्वांना धाडण्यात येत आहेत. यापूर्वी पालकमंत्र्यांनी असा दोनवेळा प्रयत्न केला होता. पण या कार्यक्रमाला सहकारमंत्री गटाच्या नगरसेवकांनी पाठ फिरवली होती. याबाबत पालकमंत्री देशमुख यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पण आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर फरक दिसेल, असा विश्वास सर्वांना वाटत आहे. या बैठकीची भाजपाबरोबरच विरोधी पक्षामध्ये चर्चा दिसून येत आहे. मुंबई दौºयावरून पदाधिकारी व सदस्य उशिरा परतल्याने मनपात आज शुकशुकाट दिसून आला.------------------------९ झोनचा विषय वादातीतसत्ताधाºयांनी शिवसेना व एमआयएमला न्याय देत ९ झोन समितीबाबत केलेला ठराव प्रशासनाकडून विखंडित होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने सुचविलेल्या प्रस्तावात बदल करून शिवसेनेची उपसूचना एकमताने मंजूर करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा गटनेत्यांनी तक्रार केली आहे. आयुक्त डॉ. ढाकणे यांनी याबाबत कायदेशीर बाबी तपासल्या जातील, असे सांगितले आहे. लोकसंख्येच्या नियमात ९ झोन बसत असले तरी भौगोलिक रचनेनुसार याबाबत गॅझेट व्हायला हवे होते. तसेच मनपाच्या आर्थिक स्थितीचा विचार करता नवीन झोनचा खर्च परवडणार नाही, असे बोलले जात आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख