मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज पंढरपुरात
By Admin | Updated: July 8, 2014 00:35 IST2014-07-08T00:35:56+5:302014-07-08T00:35:56+5:30
शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज पंढरपुरात
सोलापूर- पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंगळवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - सायं. ४.३० वा. कराड येथून पंढरपूर येथे आगमन, ५ वा. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप समारंभ, ६ वा. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी समारोप कार्यक्रम (स्थळ : पंचायत समिती), रात्री पंढरपूर येथे मुक्काम, बुधवारी पहाटे २.३० वा. विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेस उपस्थित. सकाळी ११ वा. पंढरपूरहून हेलिकॉप्टरने सोलापूरकडे प्रयाण, ११.२० वा. सोलापूरहून विमानाने मुंबईकडे प्रयाण.