शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिका सभा तहकूबबद्दल मुख्यमंत्र्यांनी विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 14:24 IST

सभागृह नेते संजय कोळी यांना आला फोन, विकासाचे प्रस्ताव मार्गी लावण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहनेते कोळी यांच्याशी संवाद साधलाविकासाचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावा अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली.

सोलापूर : मनपा सभा वारंवार तहकूब करण्यात येत असल्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. चक्क सभागृहनेते संजय कोळी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शनिवारची सभा तहकूब का केली याबाबत जाब विचारला. 

महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मार्च महिन्याची विशेष सभा झाली. या सभेला सत्ताधारी पक्षाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. विरोधी पक्षाचे तीन सदस्य सभागृहात उपस्थित असल्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की महापौरांवर आली. महापालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यापासून भाजप पदाधिकाºयांनी १५ सभा घेतल्या. यातील बहुतांश सभा तहकूब करण्यात आल्या. यामुळे प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने विकासकामे मार्गी लागण्यास अडचण  निर्माण झाल्यामुळे सत्ताधाºयांविरोधात नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

शनिवारच्या सभेत अमृत योजनेतून उर्वरित हद्दवाढ भागासाठी राबविण्यात येणारी १८0 कोटींच्या ड्रेनेज योजनेच्या ठेक्याला मंजुरी, उड्डाण पुलाच्या हरकतीवर नुकसानभरपाई देण्यासाठी निर्णय घेणे, फेरीवाले व होर्डिंगच्या धोरणाला मंजुरी देण्याचे महत्त्वाचे प्रस्ताव होते. मार्च अखेरची सभा तहकूब झाल्याने महत्त्वाचे हे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत राहिले. याबाबत ओरड सुरू झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या गोंधळाची पुन्हा एकदा दखल घ्यावी लागली हे विशेष.

सभागृहनेते संजय कोळी सोमवारी दुपारी एक वाजता आपल्या कार्यालयात कामकाज करीत असताना मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांचा मोबाईलवर कॉल आला. त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहनेते कोळी यांच्याशी संवाद साधला. मनपाच्या सभा तहकूब का केल्या जात आहेत. शनिवारच्या सभेतील ड्रेनेजच्या विषयावर निर्णय का घेतला नाही असा जाब विचारला. त्यावर सभागृहनेते कोळी यांनी घडल्याप्रकाराची माहिती दिली. यापुढे सभेचे कामकाज व्यवस्थित चालवा व विकासाचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावा अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर सभागृहनेते कोळी यांनी तातडीने महापौर शोभा बनशेट्टी व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप कळविला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस