छत्रपतींचा जयंती सोहळा आहे कोणाचं लग्न नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:42 IST2021-02-21T04:42:30+5:302021-02-21T04:42:30+5:30

पंढरपूर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त खा. संभाजीराजे छत्रपती आले होते. या दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, ...

Chhatrapati's birthday is a celebration, not someone's wedding! | छत्रपतींचा जयंती सोहळा आहे कोणाचं लग्न नव्हे!

छत्रपतींचा जयंती सोहळा आहे कोणाचं लग्न नव्हे!

पंढरपूर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त खा. संभाजीराजे छत्रपती आले होते. या दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले, रायगडावर पुरातत्व खात्याच्या सूचनेने चुकीच्या पद्धतीने विद्युत रोषणाई केली आहे. माझा पुरातत्व खात्यावर आक्षेप होता. यामुळे काळा दिवस हा शब्द पुरातत्व खात्यासाठी उद्देशून बोललो होतो. मी पुरातत्व खात्याला धारेवर धरले. परंतु खासदार श्रीकांत शिंदे यांनी चुकीचा अर्थ घेऊन माझ्यावर टीका केली आहे.

मला राजकीय टॅग लावलेले चालणार नाही. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तीबद्दल कोणी शिकवू नये. मला किल्ले रायगडवरून राजकीय बोट दाखवले तर सहन होणार नाही. माझ्यावर कोणी राजकीय टीका केली तर गाठ माझ्याशी आहे. परंतु सामान्य नागरिकांचा गैरसमज होऊ नये यासाठी मी स्पष्टीकरण दिले असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.

-----

Web Title: Chhatrapati's birthday is a celebration, not someone's wedding!