शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला येणार पुन्हा मूळरुप, चेन्नईतील केमिकल तज्ज्ञांकडून पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:47 IST

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे प्राचीन आहे. या मंदिराचे संवर्धन करणे व प्राचीन शैली जपणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देचेन्नईतील संस्था केमिकलच्या साह्याने रंग काढण्याच्या कामाचा आराखडा तयारमंदिरातील फरशा काढून त्याठिकाणी दगड बसविण्यात येणार प्रायोगिक स्वरूपात विठ्ठल मंदिराच्या काही भागांचे केमिकल वापरून रंगकाम काढण्याचे काम

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे प्राचीन आहे. या मंदिराचे संवर्धन करणे व प्राचीन शैली जपणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मंदिरातील रंग दिलेला काही भाग बुधवारी चेन्नई येथील केमिकल तज्ज्ञांनी स्वच्छ केला. यामुळे मंदिराला मूळरुप प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगरंगोटी केली होती. त्यामुळे मंदिराचे हेमाडपंथी रूप नष्ट झाले होते. परंतु मंदिर मूळ रूपातच आकर्षक दिसते, ही गोष्ट मंदिर समितीच्या लक्षात आली. यामुळे मंदिर समितीने लाखो रुपये खर्च करून नामदेव पायरी ते विठ्ठल गाभारा आदी ठिकाणी रंग काढून घेतला होता. मात्र मंदिरातील काही भाग तसाच राहिला होता. पुरातन विभागाच्या परवानगीने रुक्मिणी गाभारा, महालक्ष्मी मंदिर व अन्य ठिकाणचा रंग केमिकल तज्ज्ञांकडून काढण्यात येणार आहे.

या कामासाठी चेन्नई येथील केमिकल तज्ज्ञ गुरु मुरगन सथपाथी, मंदिर कायदा तज्ज्ञ जगन्नाथ, चैतन्य महाप्रभू निंबकशक केंद्र या संस्थेचे आऱ वेंकटेशन व जय हनुमान सेवा संस्थेचे व्यवस्थापक ट्रस्टीचे श्रीनिवासन माती हे मंदिरात आले होते. त्यांनी प्रायोगिक स्वरूपात विठ्ठल मंदिराच्या काही भागांचे केमिकल वापरून रंगकाम काढण्याचे काम केले.

चेन्नईतील संस्था केमिकलच्या साह्याने रंग काढण्याच्या कामाचा आराखडा तयार करून तो मंदिर समितीसमोर मांडणार आहे. त्यानंतर रंग काढल्यानंतर मंदिर कसे दिसते याचेही सादरीकरण होणार आहे. त्यानंतरच उर्वरित कामाला मंजुरी देण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.तसेच मंदिरातील फरशा काढून त्याठिकाणी दगड बसविण्यात येणार आहे. त्या दगडांचे नमुनेदेखील मंदिर समितीच्या अधिकाºयांना दाखवण्यात आले आहे.

पोनिंग बसविणारमंदिरातील बाजीराव पडसाळी येथील छत काढण्यात आला आहे. त्याठिकाणी पोनिंग बसविण्यात येणार आहे. हे पोनिंग बसविण्याचे काम चेन्नई येथील एका संस्था मोफत करुन देणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी