पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात बदल

By Admin | Updated: September 23, 2014 14:12 IST2014-09-23T14:12:59+5:302014-09-23T14:12:59+5:30

वारनिहाय पाणीपुरवठय़ाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे बर्‍याच भागात पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने पाणीपुरवठा विभागाने वेळापत्रकात बदल केला आहे.

Changes on the water schedule | पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात बदल

पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात बदल

 

सोलापूर : वारनिहाय पाणीपुरवठय़ाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे बर्‍याच भागात पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने पाणीपुरवठा विभागाने वेळापत्रकात बदल केला आहे. नागरिकांची सणासुदीच्या दिवसात पाण्याची गरज लक्षात घेऊन सुरळित पाणीपुरवठा करण्याचे आदेश आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिले आहेत. 
सोमवार व गुरुवार: विजापूरवेस, मधला मारुती, भांडेगल्ली, माणिक चौक, जुनी ढोरगल्ली, पुकाळे दूध डेअरी, सोमवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, चाटीगल्ली, पूर्वमंगळवारपेठ, उत्तर कसबा (मल्लिकार्जुन मंदिर परिसर), बागलेवस्ती, रमाबाई आंबेडकरनगर, हनुमाननगर, सम्राट चौक, पंधे अपार्टमेंट, मराठावस्ती, मुकुंदनगर, काडादी व शहापूर चाळ, भगतसिंग मार्केट, आदर्शनगर, रंगभवन, पत्रकारनगर, बेडरपूल, अंबिकानगर, जुना कुमठा नाका, जीवक चौक ते ताई चौक, स्वागत व अंबिकानगर, दीक्षितनगर, लतादेवीनगर, जिजामातानगर, सुरवसेनगर, कोरे हद्द, बापूजीनगर,अशोक चौक, भाजी मार्केट, इंदिरानगर, माधवनगर, सुंदरमनगर, अमृतनगर, नेहरुनगर, अशोकनगर, सुशीलनगर, एसटी कॉलनी, शिवाजी सोसायटी, लष्कर, सर्मथनगर, लोधीगल्ली, सिद्धार्थनगर, पाथरूट चौक, हैजनपूर, स्लॅटर हाऊस, अक्कलकोट रोड, संगमेश्‍वरनगर, पडगाजीनगर, यशराजनगर, वैष्णवीनगर, बेकरी बोळ, विडी घरकूल ए, बी, एच व नाल्यापर्यंत, आसरा चौक, किनारा हॉटेल, अंत्रोळीकरनगर, राजेशकुमारनगर, सोरेगाव, प्रतापनगर, एसआरपी कॅम्प, अश्‍विनी सोसायटी, गोदूताई परुळेकर विडी घरकूल. या भागांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दोन दिवसाआड पाणीपुरवठा वेळापत्रकात विडी घरकुलला पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याची तक्रार आहे. तसेच जुळे सोलापुरातही तीन व चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तक्रारी वाढल्याने महापौर सुशीला आबुटे,उपमहापौर प्रवीण डोंगरे, आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शनिवारी बैठक घेऊन वेळापत्रकात बदल केला. पाण्याची उपलब्धता व नव्या वेळापत्रकाचे रुटीन लागेपर्यंत लोकांची गैरसोय होईल असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभियंता विजयकुमार राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी) हायटेक कार्यालय.. ■ उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी पाणीपुरवठा करण्यासाठी सतत पाठपुरावा ठेवला आहे. त्यांनी आज पुन्हा पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन नियोजनाबाबत चर्चा केली.याची माहिती सर्व सदस्य व अधिकार्‍यांना तातडीने व्हावी यासाठी कार्यालय इंटरनेटने जोडले आहे. वायफाय, ई-मेल, झेरॉक्स, फॅक्स अशा सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
 

Web Title: Changes on the water schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.