भोसगे, सुलेरजवळगेत उमेदवारांच्या क्रमवारीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:37+5:302021-01-17T04:20:37+5:30

अक्कलकोट : भोसगे येथे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग २ मध्ये उमेदवाराचे नाव मराठी अक्षराच्या आद्याक्षराप्रमाणे लावण्यात झालेल्या गडबडीवरून मतदान केंद्रावर ...

Changes in the order of candidates near Bhosage, Suler | भोसगे, सुलेरजवळगेत उमेदवारांच्या क्रमवारीत बदल

भोसगे, सुलेरजवळगेत उमेदवारांच्या क्रमवारीत बदल

googlenewsNext

अक्कलकोट : भोसगे येथे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग २ मध्ये उमेदवाराचे नाव मराठी अक्षराच्या आद्याक्षराप्रमाणे लावण्यात झालेल्या गडबडीवरून मतदान केंद्रावर काही काळ वातावरण तणावाचे बनले. दरम्यान, तहसीलदार अंजली मरोड आणि पाेलीस निरीक्षक विजय जाधव यांनी या केंद्रावर धाव घेतली. याबाबत माहिती घेऊन त्यांनी खुलासा करताच वातावरण निवळले. काही बंद राहिलेली मतदानप्रक्रिया पुन्हा कार्यरत झाली. असाच प्रकार दिवसभरात सुलेरजवळगेत घडला.

ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. भोसगेतील एका केंद्रावर चुकून वरील उमेदवाराचे नाव खाली व खालचे नाव वर झाले. काही वेळाने ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. पोलिंग एजंट यांची स्वाक्षरी घेऊन दुरुस्त केले. त्यानंतर एक कर्मचारी एका वरिष्ठ अधिकाऱ्यास मोबाईलवरून मोठ-मोठ्या आवाजात बोलत होते. यावरून काही लोकांना संशय आला आणि गडबड झाल्याचा प्रकार त्यांना लक्षात येताच मतदान केंद्रावर गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळात काही काळ मतदान बंद ठेवावे लागले होते. त्यानंतर ही बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. तहसीलदार अंजली मरोड व दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. तहसीलदारांनी ग्रामस्थांना हकीकत सांगितली. नागरिकांचे समाधान होताच पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. असाच प्रकार सुलेरजवळगीमध्ये घडला.

--

भोसगे येथे ग्रामपंचायत निवडणुकीत काहीच चुकीचे घडले नाही. राहिलेली किरकोळ दुरुस्ती अधिकाऱ्यांनी केली. मात्र, एक कर्मचारी चुकीच्या पद्धतीने मोबाईलवरून वरिष्ठांना बोलत होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये गैरसमज झाला होता. तहसीलदारांनी धाव घेऊन माहिती घेतल्यानंतर त्यांनी मतदारांपुढे खुलासा केला. पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.

- राणा वाघमारे

निवडणूक निर्णय अधिकारी

---

फोटो : १६ अक्कलकोट, १६ अक्कलकोट १

सुरुवातीला मशिनवर चिन्ह असे लावले गेले होते. त्यानंतर दुरुस्ती करून त्यानंतर ईव्हिएम मशीनवरील बॅलेटमध्ये दुरुस्ती झाली.

Web Title: Changes in the order of candidates near Bhosage, Suler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.