शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र अन् तेलंगणामधील मुलींसाठी चंद्राबाबूंचे उद्धव ठाकरेंना ट्विट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 13:02 IST

तमिळनाडूतील ८०० हून अधिक मजुरांसाठी धावणार खास रेल्वे; जिल्हा प्रशासनाची माहिती

ठळक मुद्देसोलापुरातून इतर राज्यात जाण्यासाठी १२ हजार ८४६ जणांचे अर्ज प्राप्त निवारा शिबिरातील ३२९० स्थलांतरित मजुरांचा समावेश इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ५५२८ अर्ज प्राप्त झाले आहेत

सोलापूर : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या  तमिळनाडूतील ८०० पेक्षा जास्त मजुरांना गावी पाठविण्यासाठी पंढरपूर येथून रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. दरम्यान, आंध्र आणि तेलंगणा येथील २६० मुली सोनी महाविद्यालयातील निवारा केंद्रात अडकून पडल्या आहेत. या मुलींना मदतीसाठी आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ट्विट केले आहे. 

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थलांतरित मजूर अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.  सोलापुरातून इतर राज्यात जाण्यासाठी १२ हजार ८४६ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये निवारा शिबिरातील ३२९० स्थलांतरित मजुरांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ५५२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया सुरु आहे. इतर जिल्ह्यातून सोलापुरात येण्यासाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या १०८ जणांना नाहरकत प्रमाणपत्र संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या १५७ अर्जांना नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे अर्ज पाठविण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

अर्ज करताना ही काळजी घ्या - आॅनलाईन अर्ज करताना नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणपत्र, छायाचित्र, ओळखपत्र अपलोड करावे. नागरिकांना ज्या जिल्ह्यात जायचे आहे त्या जिल्हा प्रशासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र आल्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही. तरी नागरिकांनी आॅनलाईन अर्ज करताना दक्षता घ्यावी , असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे.

सोलापुरातच थांबल्या तेलंगणा राज्यातील मुली- आंध्र, तेलंगणा राज्यातील २६० मुली सोनी कॉलेजमधील निवारा केंद्रात आहेत. या दोन्ही सरकारांनी आपल्या नागरिकांना आपल्या राज्यात घेण्यास तूर्तास मनाई केली आहे. दरम्यान या मुलींनी मदत मिळावी यासाठी चंद्राबाबूंना ट्विट केले होते. चंद्राबाबूंनी यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ट्विट केले. आता जिल्हा प्रशासन काय करते याकडे लक्ष आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूUddhav Thackerayउद्धव ठाकरे