शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चंदनचोर महिला टोळीला सोलापुरात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:11 IST

वनविभागाने ताब्यात घेतलेल्या महिलांची तपासणी केली असता त्यांच्याकडे  एक करवत, पाच कुºहाड, एक कुदळ व चंदन झाड तपासणीसाठी वापरण्यात येणारी ड्रील मशीन आढळून आले.

ठळक मुद्देचंदनाची झाडे कापून चोरी करणाºया पाच चंदनचोर महिलांच्या टोळीला वनमजुरांनी पाठलाग करून पकडले. सिद्धेश्वर वनविहारामध्ये दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास सुरू असून, यानंतर त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून चंदनाची झाडे कापून चोरी करणाºया पाच चंदनचोर महिलांच्या टोळीला वनमजुरांनी सोमवारी पाठलाग करून पकडले. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये दोन मजूर किरकोळ जखमी झाले. सिद्धेश्वर वनविहारामध्ये दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

सिद्धेश्वर वनविहारामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाच्या कर्मचाºयांची नजर चुकवून चंदनाची मोठमोठी झाडे कापून चोरी केली जायची. प्रत्यक्ष चोर मात्र सापडत नव्हते. या टोळीला जेरबंद करण्यासाठी रात्रीची गस्तही वाढविण्यात आली होती. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास रामभाऊ निरवणे गस्त घालत असताना त्यांना झाडीमध्ये काही महिला संशयास्पदरित्या फिरताना दिसल्या.

तत्काळ त्यांनी फोनवरून वन अधिकाºयांना कळविले. लागलीच घटनास्थळी वन परिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव, वनरक्षक शुभांगी कोरे, वनिता इंगोले, अनिता शिंदे व वन मजुरांचे पथक पोहोचले. वन विभागाची चाहूल लागताच महिला आरोपींनी त्यांच्या दिशेने दगड फेकले व पळून जाण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत वन मजूर मारुती खिलारे व चंद्रशेखर खजुरे, प्रसन्नजीत भोसले किरकोळ जखमी झाले. पाठलाग करून सर्व महिला आरोपींना पकडण्यात आले. 

या महिलांना पाठलाग करून जेरबंद करण्यात प्रसन्नजीत भोसले, जालिंदर माळी, मारुती खिल्लारे, दत्ता जाधव, चंद्रशेखर खजुरे, रामा निरवणे, राजू गायकवाड, मुन्ना निरवणे, सुधाकर चौधरी, दिगंबर गाढवे यांनी मोलाची भूमिका निभावली.

वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव यांनी अधिक चौकशी केली असता ताब्यात घेण्यात आलेल्या महिला गेल्या अनेक वर्षांपासून चंदनचोरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक तपास सुरू असून, यानंतर त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कुºहाडीसह चटणीचा डबा आढळला- त्याची तपासणी केली असता त्यांच्याजवळ एक करवत, पाच कुºहाड, एक कुदळ व चंदन झाड तपासणीसाठी वापरण्यात येणारी ड्रील मशीन आढळून आली. तोडलेल्या चंदन झाडांचे २० ते २५ किलो ओंडके व कोणी पकडण्यासाठी आले तर प्रतिकार करण्यासाठी डोळ्यात फेकण्यासाठी लाल चटणीचा डबाही आढळून आला. सर्व ंमहिला आरोपी संपूर्ण तयारीने चंदन चोरीसाठी आलेल्या होत्या. अधिक चौकशी केली असता या पाच जणींपैकी कुरुलची एक, कामतीच्या दोघी आणि एक वाळूज देगाव येथील असल्याचे आढळले. 

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोर