शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्या राज्यात सर्वत्र चक्का जाम आंदोलन; राजू शेट्टी यांची माहिती

By appasaheb.patil | Updated: February 21, 2023 16:47 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.

सोलापूर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या (बुधवार २२ फेब्रुवारी) राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला असल्याची माहिती माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व प्रश्न सोडविण्यासाठी ते सोलापुरात आले आहेत, तत्पूर्वी त्यांनी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की,  महावितरण विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळत नाही,  कांदा, साखर यासारख्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून जात असलेल्या सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग तसेच रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या निधी कवडीमोल किंमतीने शासनाकडून संपादित केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी आमची मागणी आहे.

 शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व अडचणी संदर्भात उद्या होत असलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असेही आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

 विद्यार्थ्यांना अडचणी येऊ देणार नाही सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. आमच्या चक्का जाम आंदोलनामुळे बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येऊ देणार नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीagitationआंदोलन