शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

साक्षरतेचा जयघोष दिल्लीपर्यंत पोहोचला; वारी साक्षरतेची उपक्रमाची केंद्रीय स्तरावर दखल

By appasaheb.patil | Updated: July 19, 2024 17:59 IST

आषाढी वारी कालावधीत जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये प्रति साक्षरता दिंडी सोहळा पार पडला.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : आषाढी वारीच्या निमित्ताने वारी साक्षरतेची हा साक्षरता कार्यक्रमाच्या प्रसार, प्रचारासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांत विविध उपक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमातून निरक्षर वारकरय्ंना साक्षर करण्याचा जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वारीकाळात केलेल्या कामांमुळे सोलापूरच्या साक्षरता वारीची केंद्रीय शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. केंद्रीय शिक्षण अवर सचिव प्रदीप हेडाऊ यांनी शिक्षणाधिकारी योजना यांच्या कामांचे कौतुक केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा वठार यांनी दिली. 

आषाढी वारी कालावधीत जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये प्रति साक्षरता दिंडी सोहळा पार पडला. वारीतील सर्व वारकऱ्यांना साक्षरता कार्यक्रमांच्या प्रसारपत्रकांचे वाटप करून प्रसार करण्यात आला. प्रत्येक पालखीसोबतच्या दिंडीचे पालखी मार्गावरील सर्व शाळांनी साक्षरता रांगोळी, प्रतिदिंडी, घोषवाक्य, बॅनर यासह राज्य साक्षरता दिंडीचे स्वागत केले. सोलापूर जिल्हयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे वारकरी वर्ग, दिंडी व पालख्यांचे प्रमाण लक्षात घेता नियामक परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ११ ते १७ जुलै २०२४ या कालावधीत गीताद्वारे साक्षरता प्रचार करण्यासाठी मोहोळच्या स्वानंद टिचर्स म्युझिकल ग्रुपने स्वरचित रेकॉर्ड केलेला साक्षरता गीतांचा गीतमंच कार्यक्रम खूपच प्रभावी ठरला.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर