शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

स्मशानभूमीलाच आपलं घर मानलं; ती माय ढासळलेली चिता रचते, खड्डेही खणते ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 12:12 IST

रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : अंत्यविधीला स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली तर प्रत्येकजण तिथून लगेच काढता पाय घेतात पण  नागूबाई भगवान ...

रेवणसिद्ध जवळेकरसोलापूर : अंत्यविधीला स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली तर प्रत्येकजण तिथून लगेच काढता पाय घेतात पण  नागूबाई भगवान डोलारे या ७० वर्षीय महिलेने स्मशानभूमीलाच आपलं घर मानलं. काळोख, अंधाराला सोबती करीत नागूबाई मोदी स्मशानभूमीत ढासाळलेली चिता रचते अन्‌ दफनविधीसाठी थडगंही खणून आपली सेवा बजावते.  कोरोनाच्या संकटातही महापालिका प्रशासनाला त्यांचा खूप मोठा आधार मिळाला.

नागूबाई यांचे माहेर कर्नाटकातील रायचूर येथील. सोलापुरातील मोदी भागात राहणाऱ्या भगवान डोलारे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. स्मशानभूमीतच त्यांचा संसार असेल असे नागूबाईंना वाटलेही नव्हते. एकीकडे पती स्मशानभूमीत सेवा बजावताना दुसरीकडे नागूबाई घाबरल्याच. पतीने धीर दिला म्हणून त्यांची मानसिकता बदलत गेली.    दरम्यान, पती भगवानचे निधन झाल्यानंतर चार मुलं आणि दोन मुलींबरोबर त्यांनी नेटाने पतीच्या सेवेची परंपरा राखली. आज त्यांची दोन मुलं देवाघरी गेली असली तर राजू आणि कुमार ही दोन मुलंही आईच्या स्मशानसेवेला हातभार लावत आहेत. नागूबाईच्या मदतीला भावजय शांताबाई सगले याही स्मशानात दिवस काढत सेवेला बळकटी देत आहेत.

कोरोना वॉरियर्स म्हणून सेवाएप्रिलनंतर सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. कोरोनाने मरण पावलेल्यांची प्रेतं एकापाठोपाठ दहनासाठी स्मशानभूमीत येत होते. त्याला वेळ काळ नव्हता. मुलगा राजूला सोबत घेऊन नागूबाई विद्युत दाहिनीत तळ ठोकून असायच्या. काळोख, अंधारात फिरणारे विषारी सापांची तमाही त्यांनी कधी बाळगली नाही. सापांची अन्‌ आमच्या कुटुंबातील सदस्यांचे एक नातं असावं. म्हणूनच आमच्या वासानं हे साप आमच्या जवळही कधी आले नाहीत. कोरोनाच्या संकटात नागूबाई यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून आपली छाप सोडली. 

पदर खोचून कामाला लागतात..मोदी स्मशानभूमीतच घर असलेल्या नागूबाई घरातील सदस्यांच्या अनुपस्थितीत स्वत: थडगंही खणतात. ५ बाय ५ चं ४ फूट थडगं खणण्यासाठी दोन-अडीच तास लागतात. हे काम करतानाही त्यांनी श्रमपूजा असल्याचे सांगतात. 

महापालिकेने स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे लक्ष घातले पाहिजे. अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अधिकाधिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, ही माझी भावना आहे. भविष्यात ही स्मशानभूमी नंदनवन झाली पाहिजे. - नागूबाई डोलारे

टॅग्स :SolapurसोलापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिनcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका