मंगळवेढ्यात योग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:16 IST2021-06-22T04:16:07+5:302021-06-22T04:16:07+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रोटोकॉलनुसार आसने व प्राणायाम जिल्हा प्रभारी नितीन मोरे, योग शिक्षक शिवकुमार स्वामी व महिला तालुका ...

Celebrate Yoga Day on Mars | मंगळवेढ्यात योग दिन साजरा

मंगळवेढ्यात योग दिन साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रोटोकॉलनुसार आसने व प्राणायाम जिल्हा प्रभारी नितीन मोरे, योग शिक्षक शिवकुमार स्वामी व महिला तालुका प्रभारी प्रफुल्लता स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. मुख्याधिकारी परचंडराव यांनी निरोगी राहण्यासाठी योग व प्राणायाम गरजेचा असून सर्वांनी आहारसुद्धा चांगला ठेवावा, असे सांगितले. यावेळी ओंकार मंडले, गौरी मोरे, प्रसाद मोरे, ऋषिकेश चव्हाण, अजिंक्य मोरे, सुमित दुधाळ, चेतन महामुनी, कृष्णा भोसले या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी आगतराव बिले, विलास आवताडे, वैद्य बबन भोसले, अरविंद क्षीरसागर, महादेव पिसे, मारुती वाकडे, शिवाजी मुळे, संजय कुलकर्णी, ॲड. रमेश जोशी, सुरेश जोशी, स्वामी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक धर्मराज जाधव यांनी केली तर भारत स्वाभिमान न्यास सोलापूर प्रभारी संतोष दुधाळ, नगरपालिका प्रशासन आणि योग समितीच्या साधकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Celebrate Yoga Day on Mars