सांगोला विद्यामंदिरचा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:22 IST2021-03-05T04:22:24+5:302021-03-05T04:22:24+5:30

सांगोला : तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा ६१ वा वर्धापन साजरा करण्यात आला. प्रारंभी पाटबंधारे विभाग सेवानिवृत्त सचिव व संस्था ...

Celebrate the anniversary of Sangola Vidyamandir | सांगोला विद्यामंदिरचा वर्धापन दिन साजरा

सांगोला विद्यामंदिरचा वर्धापन दिन साजरा

सांगोला : तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा ६१ वा वर्धापन साजरा करण्यात आला. प्रारंभी पाटबंधारे विभाग सेवानिवृत्त सचिव व संस्था कार्यकारिणी सदस्य प्रफुल्लचंद्र झपके यांच्या हस्ते संस्थाध्यक्ष स्व. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म. शि. घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, डी. डी. जगताप , चंद्रशेखर अंकलगी, प्राचार्य पोपट चवरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेला आयएसओ मानांकन, प्रशस्तीपत्रक प्राप्त झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. धनाजी चव्हाण व प्रा. डी. के. पाटील यांनी केले तर आभार सुनील भोरे यांनी मानले.(वा. प्र.)

----

०४ सांगोला स्कूल

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापननिमित्त सदस्य प्रफुल्लचंद्र झपके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थाध्यक्ष प्रा. पी. सी .झपके, सचिव म. शि. घोंंगडे उपस्थित होते.

Web Title: Celebrate the anniversary of Sangola Vidyamandir