शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील कोरोना हॉटस्पॉटवर आता सीसीटीव्हीची कॅमेºयाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 11:52 IST

नगरविकास मंत्र्यांचे सोलापूरवर आहे लक्ष; शहरातील १३ हॉटस्पॉट पोलीसांनी केले सील

ठळक मुद्देराज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर महापालिकेला ४०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड, २०० लिटर सॅनिटायझर पाठविले शास्त्रीनगर, भारतरत्न इंदिरानगर या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरूउर्वरित भागात आगामी चार ते पाच दिवसांत कॅमेरे बसविण्यात येणार

सोलापूर : शहरातील शास्त्रीनगर, भारतरत्न इंदिरानगर यासह १३ परिसर कोरोना हॉटस्पॉट ठरले आहेत. या परिसरातील हालचालींवर आता महापालिकेच्या सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर असणार आहे. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. 

शहराच्या निम्म्यापेक्षा जास्त परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील १३ परिसर हे कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात. या परिसरातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाखेरीज बाहेर पडू नये, असे आदेश प्रशासनाकडून  दिले जातात. मात्र त्याकडे दुर्लक्ष  होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या परिसरातील हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेºयांच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

रविवारी शास्त्रीनगर, भारतरत्न इंदिरानगर या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू होते. उर्वरित भागात आगामी चार ते पाच दिवसांत कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 

लेडी डफरीन हॉस्पिटलमध्ये एक नियंत्रण कक्ष करण्यात आला आहे. या कक्षातून १३ परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या भागात आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. अत्यावश्यक सुविधा पुरविल्या जात आहेत. यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. 

नगरविकास मंत्र्यांनी मनपाला पाठविले सॅनिटायझरराज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर महापालिकेला ४०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड, २०० लिटर सॅनिटायझर पाठविले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी आयुक्त दीपक तावरे आणि उपायुक्त अजयसिंह पवार यांना हे साहित्य सुपूर्द केले. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcctvसीसीटीव्हीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका