शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान; सॅनिटायझरच्या अति वापराने त्वचेवर होतोय परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:20 IST

त्वचारोग तज्ज्ञांचे मत : शंभर नागरिकांमधून एकाला होतोय त्रास

ठळक मुद्देज्यांची त्वचा संवेदनशील (सेन्सेटिव्ह) आहे अशा लोकांच्या त्वचेला भेगा पडणे, त्वचा कोरडी पडणे, लाल होणे अथवा खाज सुटत असतेसॅनिटायझरने जीवाणू नष्ट करून अनेक आजारांपासून आपले रक्षण करतोविषाणूंचा चांगल्या पद्धतीने नाश व्हावा म्हणून यामध्ये केमिकल आणि अल्कोहोलचा वापर केलेला असतो

सोलापूर : कोरोनाची भीती अद्याप संपलेली नाही. कोरोनामुळे अनेक जण दगावले... कोरोनाची लागण होईल ही एकच भीती. त्यापेक्षा उपचारासाठी मोठी रक्कम कशी उभी करायची ही चिंता अधिकच. कोरोना होऊ नये म्हणून बहुतांश जण सॅनिटायझरचा सातत्याने वापर करीत असताना त्याचा काही जणांच्या त्वचेवर परिणाम होत असतो, असे मत त्वचारोग तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले. शंभर जणांमधून एकाला हा त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

ज्यांची त्वचा संवेदनशील (सेन्सेटिव्ह) आहे अशा लोकांच्या त्वचेला भेगा पडणे, त्वचा कोरडी पडणे, लाल होणे अथवा खाज सुटत असते. त्यामुळे सॅनिटायझरचा त्वचेवर परिणाम होत आहे. सॅनिटायझरने जीवाणू नष्ट करून अनेक आजारांपासून आपले रक्षण करतो. विषाणूंचा चांगल्या पद्धतीने नाश व्हावा म्हणून यामध्ये केमिकल आणि अल्कोहोलचा वापर केलेला असतो.  

सध्या बाजारात जेल आणि पातळ सॅनिटायझर उपलब्ध आहे. त्यापैकी पातळ जास्त परिणामकारक असते. कारण ते हातांच्या सूक्ष्म भेगांपर्यंत पोहोचू शकते. जेलच्या स्वरुपातले मात्र त्वचेच्या खोलवर पोहोचू शकत नाही व वरच्या भागावरच थर बनून राहते. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्याही सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे कमीत-कमी प्रमाण ६० टक्के असावे तर जास्तीत-जास्त प्रमाण ६० ते ९० टक्के असावे असे स्पष्ट केले आहे. अधिकांश अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरमध्ये इथेनॉल, आयसोप्रोपील अल्कोहोल, एन-प्रोपेनोल वा यातील कोणत्याही दोन उत्पादनांचे कॉम्बिनेशन असते. त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून यात काही प्रमाणात ग्लिसरीन मिसळले जाते.

असे ओळखा बनावट सॅनिटायझरबाजारात काही बनावट सॅनिटायझर आहेत, ती आपण ओळखू शकतो, पेपरवर पेनच्या मदतीने एक वर्तुळ काढा त्यावर काही सॅनिटायझरचे काही थेंब टाका शाई पसरली तर ते सॅनिटायझर बनावट असून वापरण्यास योग्य नाही. जर सॅनिटायझर योग्य असेल तर शाई पसरणार नाही आणि ओला पेपर सुद्धा कोरडा होईल.

ज्या लोकांची त्वचा सेन्सेटिव्ह आहे त्यांना त्वचेवर भेगा, कोरडेपणा, लाल होणे, खाज सुटणे अशी लक्षणे आढळून येत आहेत. जेव्हा साबण आणि पाण्याने आपले हात धुणे शक्य नसते तेव्हाच सॅनिटायझरचा वापर करावा हाच यावर उपाय आहे. - डॉ. सचिन कोरे,त्वचारोग तज्ज्ञ.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीय