तडवळेत वाळूसह वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:22 IST2021-03-18T04:22:03+5:302021-03-18T04:22:03+5:30

वैराग : तडवळे (ता. बार्शी) येथील भोगावती नदीपात्रात विनापरवाना वाळू उपसा करणा-या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

Caught the vehicle with sand in the tadpole | तडवळेत वाळूसह वाहन पकडले

तडवळेत वाळूसह वाहन पकडले

वैराग : तडवळे (ता. बार्शी) येथील भोगावती नदीपात्रात विनापरवाना वाळू उपसा करणा-या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सहा लाख सात हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार बुधवारी सकाळी नऊ वाजता तडवळे येथील भोगावती नदी पात्रातून चोरून वाळू उपसा होत असल्याची माहिती वैराग पोलीसांना मिळाली होती. आरोपी दीपक कल्याण लोखंडे हा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून एक ब्रास वाळू घेवून निघालेला होता. कारवाई दरम्यान वाळूसह ट्रँक्टर व ट्रॉली ताब्यात घेत ६ लाख ७ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत लोखंडे विरोधात वैराग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पोलीस काँन्स्टेबल सचिन मुंढे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक शिवाजी हाळे करीत आहेत.

Web Title: Caught the vehicle with sand in the tadpole