वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:21 IST2021-04-25T04:21:42+5:302021-04-25T04:21:42+5:30

पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील, राहुल देशमुख, शिवाजी काळेल हे वरिष्ठांच्या आदेशाने कोळा दूरक्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान ...

Caught two transporting sand | वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले

वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले

पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील, राहुल देशमुख, शिवाजी काळेल हे वरिष्ठांच्या आदेशाने कोळा दूरक्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान हातीद येथील शिंदेवस्तीजवळील बेलवण नदीतून पिकअपमध्ये चोरून वाळू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे खासगी वाहनाने हातीद (शिंदे वस्ती) शाळेजवळ पोलीस थांबले. त्यावेळी हातीदकडून विनानंबरचा पिकअप येताना दिसला. पोलिसांनी चालकास हात करून थांबविले असता पिकअपमध्ये अर्धा ब्रास वाळू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या वाळू वाहतुकीचा परवाना आहे का असे विचारले असता चालकाने नसल्याचे सांगितले. पोलिसांनी अर्धा ब्रास वाळूसह पिकअप ताब्यात घेऊन जप्त केले. याबाबत पोलीस काॅन्स्टेबल बाबासाहेब पाटील यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी चालक करण अरूण माने व मालक अमोल बाळासाहेब पाटील (रा. जुनोनी, ता. सांगोला) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Caught two transporting sand