वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:24 IST2021-05-27T04:24:07+5:302021-05-27T04:24:07+5:30

पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस नाईक विजय थिटे, पोलीस कॉन्स्टेबल कोळवले, पोलीस ...

Caught with two tractor trolleys transporting sand | वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले

वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले

पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस नाईक विजय थिटे, पोलीस कॉन्स्टेबल कोळवले, पोलीस पाटील, होमगार्ड हे कोळा दूरक्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी घाडगे वस्ती ते मदनेवस्ती रोडवरील गोरख घाडगे यांच्या विहिरीजवळ एकामागून एक असे दोन ट्रॅक्टर येताना दिसले. पोलिसांनी चालकाला ट्रॅक्टर रोडच्या बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी एक चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, तर दुसऱ्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी एमएच १०/एवाय २६१४ व विना नंबरचे दुसरे ट्रॅक्टर, असे ७ लाख ४८ हजार रुपयांचे दोन ट्रॅक्टर ट्राॅलीसह ८ हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू जप्त करून ताब्यात घेतले. याबाबत, पोलीस नाईक विजय थिटे यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Caught with two tractor trolleys transporting sand