अवैध दारू विकणाऱ्या तिघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:41+5:302021-01-03T04:22:41+5:30

पोलिसांनी अशोक भोसले (रा. कर्मवीर नगर, सांगोला), गणेश महांकाळ (रा. वासूद रोड, सांगोला), नारायण शिंदे (रा. मांजरी, ता. ...

Caught three selling illegal liquor | अवैध दारू विकणाऱ्या तिघांना पकडले

अवैध दारू विकणाऱ्या तिघांना पकडले

पोलिसांनी अशोक भोसले (रा. कर्मवीर नगर, सांगोला), गणेश महांकाळ (रा. वासूद रोड, सांगोला), नारायण शिंदे (रा. मांजरी, ता. सांगोला) यांना ताब्यात घेतले.

सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, सहा. पोलीस निरीक्षक माने, सहा. फौजदार मुजावर, सहा. फौजदार पवार, पोलीस नाईक विकास क्षीरसागर हे थर्टी फर्स्टनिमित्त सांगोला ते पंढरपूर रोडवर पेट्रोलिंग करीत होते. मांजरी गावाच्या हद्दीत हॉटेल स्वाद व हॉटेल टर्निंग पॉइंटच्या पाठीमागे तीन इसम देशी-विदेशी दारूची विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी तेथे छापा मारला. या वेळी अशोक भोसले व गणेश महांकाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ हजार २३४ रुपयांचे देशी-विदेशी मद्य जप्त केले. तर हॉटेल टर्निंग पॉइंटच्या पाठीमागे छापा मारून नारायण शिंदे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४ हजार ३२० रुपयांचे देशी-विदेशी मद्य जप्त केले. या प्रकरणी पोना विकास क्षीरसागर यांनी तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधि.कलम ६५(ई)प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Caught three selling illegal liquor