कुलूपबंद टेम्पोतून वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:40 IST2021-03-13T04:40:55+5:302021-03-13T04:40:55+5:30

पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्या आदेशान्वये सहा. फौजदार संजय राऊत, पोलीस विकास क्षीरसागर, हवालदार तानाजी लिंगडे, धुळा चोरमुले हे ...

Caught a tempo transporting sand from a locked tempo | कुलूपबंद टेम्पोतून वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

कुलूपबंद टेम्पोतून वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्या आदेशान्वये सहा. फौजदार संजय राऊत, पोलीस विकास क्षीरसागर, हवालदार तानाजी लिंगडे, धुळा चोरमुले हे बुधवारी रात्री गस्त घालत असताना दिघंचीकडून बंद बाॅडीचा (एमएच ०९/एल ६६१०) हा आयशर टेम्पो भरधाव वेगाने महूदकडे निघाला होता. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना या टेम्पोचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करून महूदजवळच्या पाण्याच्या टाकीजवळ पकडून तपासणी केली. यावेळी कुलूपबंद बाॅडीच्या दरवाजाच्या टेम्पोतून वाळू चोरीचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत पोलीस नाईक विकास मसु क्षीरसागर यांनी फिर्याद दिली असून टेम्पोमालक-चालक अक्षय अनिल मोरे (रा. दिघंची, ता. आटपाडी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. पोलिसांनी हा टेम्पो वाळूसह जप्त करून पोलीस स्टेशनला आणून लावला आहे.

फोटो ११पंड०८

कुलूपबंद दरवाजाच्या टेम्पोतून विनापरवाना चोरून वाळूची वाहतूक करताना पोलिसांनी पकडलेला हाच तो टेम्पो.

Web Title: Caught a tempo transporting sand from a locked tempo