मटका खेळणाऱ्या सात जणांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:27+5:302020-12-13T04:36:27+5:30
मंगळवेढा :मटका खेळणाऱ्या सात जणांना पकडून मंगळवेढा पोलिसांनी कारवाई केली. ११ डिसेंबर रोजी दुपारी दीड ते साडेचार च्या दरम्यान ...

मटका खेळणाऱ्या सात जणांना पकडले
मंगळवेढा :मटका खेळणाऱ्या सात जणांना पकडून मंगळवेढा पोलिसांनी कारवाई केली. ११ डिसेंबर रोजी दुपारी दीड ते साडेचार च्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.
या कारवाईत श्रीकांत शुक्राचार्य निकम (वय ४१, रा. भाळवणी), चंद्रकांत संभाजी नलवडे ( वय ४०, रा. आदर्श नगर, नागणे गल्ली, ता. मंगळवेढा), संदीप दामोदर हेंबाडे (रा. खंडोबा गल्ली, मंगळवेढा), रवींद्र विठ्ठल जाधव (वय ३६, रा. मंगळवेढा), नईम शिराउद्दीन खतीब (वय ५२, रा. काझी गल्ली), संजय शिवाजी मुद्गुल (वय ३८, रा. खंडोबा गल्ली), कैलास कोळी (रा. मंगळवेढा) या सात जणांना समज देऊन सोडण्यात आले. तसेच ५६३६५ रुपये व आठ मोबाइल हँडसेट असा एकूण १ लाख ९ हजार ३६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस हवालदार सचिन हेमराज दरदरे करीत आहेत.